NCP: ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत स्वागत केले.
NCP Agitaion in Jalgaon
NCP Agitaion in JalgaonSarkarnama

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीतील (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध (Chief Minister) घोषणाबाजी करून आंदोलन केले. आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिस पथकाने (Police team) अटक करून सुटका केली. (NCP agitation against CM Eknath Shinde in Jalgaon)

NCP Agitaion in Jalgaon
Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. पाळधी (ता. धरणगाव) येथील सभा आटोपून राष्ट्रीय महामार्गाने आकाशवाणीमार्गे मुक्ताईनगरकडे त्यांचा ताफा निघणार असतानाच, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओक्के’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

NCP Agitaion in Jalgaon
Shivsena: नाशिकचे सतरा माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर?

मात्र, मुख्यमंत्र्यांचा ताफा आकाशवाणीमार्गे येण्याअगोदरच संबंधित आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशोक लाडवंजारी, रहिम तडवी, मंगला पाटील, सुनील माळी, राजू मोरे, जितू चौधरी, इब्राहिम तडवी, रफिक पटेल, दत्तात्रय सोनवणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in