NCP News; हिंदू-मुस्लीम व सुवासिनी- विधवांसह आगळा वेगळे हळदी कुंकू!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी भगूर शहरात साजरी केली मकरसंक्रांत
Prerana Balkawde with Muslim womens
Prerana Balkawde with Muslim womensSarkarnama

नाशिक : (Nashik) मकर संक्रांत, तीळगूळ आणि हळदीकुंकू हे समीकरणच आहे. हा भारतीय महिलांसाठी (Womens) आवडीचा सण. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. हळदी-कुंकू म्हंटले तर फक्त हिंदू धर्मातील सुवासिनी अशी परंपरा आहे. मात्र परंपरेला छेद देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawde) यांनी (Hindu) हिंदू- मुस्लीम (Muslim) आणि सुवासिनी-विधवा या सर्व मैत्रीणींना हळदी कुंकू देत हा उत्सव वेगळ्या व पुरोगामी पद्धतीने साजरी केला. (NCP womens Wing Prerana Balkavde celebrates Makar Sankranti with Muslims & Widow)

Prerana Balkawde with Muslim womens
Congress News; केंद्रातील भाजप सरकारमुळे शेतकरी संकटात

परस्परांतील नाते, मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी हळदी कुंकू समारंभा साजरा केला जातो. सध्या असे समारंभ जोरात आहेत. विशेषतः येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांचे नेते, महिला कार्यकर्त्या हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र येथील प्रेरणा बलकवडे यांनी पारंपारीक पद्धतीला बाजुला सारत वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ केला.

Prerana Balkawde with Muslim womens
Chhagan Bhujbal; शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावा!

मकर संक्रांती निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने भगूर येथे महिलांसाठी "हळदी- कुंकू" समारंभ आयोजित करण्यात आला होता. गेल्या १० वर्षांपासून या कार्यक्रमानिमित्त भगूरच्या महिला एकत्रित येतात. सध्या तर हळदी-कुंकू समारंभाचे रूपांतर महिलांच्या स्नेहमेळाव्यात होते आहे.

त्यात सर्व महिला उस्फुर्तपणे कार्यक्रमाचा आनंद घेतात. “महिला हिंदू, मुसलीम, ख्रिस्ती कुठल्या धर्माची हे दुय्यम आहे. महिला हीच आमची जात आणि हाच अमचा धर्म हे आम्ही मानतो, असे प्रेरणा बलकवडे सांगतात कोणताही सण साजरा करण्यासाठी आम्ही मैत्रीणींनी एकत्र येणे हा प्रत्येकीचा अधीकार आहे, तो आम्ही पार पाडला.

रुढी आणि परंपरेच्या बंधनात अडकलेल्या विधवा महिलांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी या रुढींना फाटा देण्यासाठी सौ. बलकवडे यांनी जिल्ह्यात विधवा प्रथा बंद करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी भगूर शहरात आगळे वेगळे हळदी कुंकू ज्यात हिंदू- मुसलीम, सुवासिनी-विधवा सर्व मैत्रीणींना एकत्र आणून मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. हा वेगळा उत्सव चर्चेचा विषय़ ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com