नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सन्मानपूर्वक आघाडीसाठी होतेय चर्चा.
नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार?
NCP leader Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अधिकाअधिक उमेदवारांच्या विजयाची तयारी करावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी केली.

NCP leader Chhagan Bhujbal
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नाशिक व मालेगाव महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमधील पक्ष्यांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा पुनर्उच्चार श्री. भुजबळ यांनी केला.

पालकमंत्री म्हणाले, की जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी निर्णायक स्थितीत राहिला आहे. त्यामुळे आता अधिक उमेदवार निवडून आणावेत. शिवाय राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने पक्षीयस्तरावर सन्मानपूर्वक आघाडी करण्यास आपला प्रयत्न असेल. शहर आणि जिल्ह्यात केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

NCP leader Chhagan Bhujbal
अमित देशमुखांच्या आशीर्वादाने राज्याच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कामाला सुरवात करावी. आपल्या परिसरात कोरोनाविषयक आवश्यक ती मदत करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. बैठकीत नाशिक, मालेगाव महापालिका, नगरपालिका-नगरपंचायती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा आग्रह

आगामी निवडणुकांविषयक चर्चेत उपस्थितांनी सहभागी होत आपली भूमिका मांडली. त्याचवेळी सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा विश्‍वास पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीसाठी तयारी करत असताना दुसरीकडे स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसने लढण्याची तयारी केले असल्याचे संकेत मिळाले आहेत.

भुजबळ फार्ममधील कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार ॲड माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख, माजी आमदार जयवंत जाधव, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पवार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in