आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचे आघाडीलाच प्राधान्य

प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत येवला येथे आढावा बैठक
Dilip Khaire, NCP leader
Dilip Khaire, NCP leaderSarkarnama

येवला : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्ह्यात कोट्यावधीची निधी आणला आहे. येवला (Yeola) तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून भुजबळांच्या नेतृत्वाखाली येथून पक्षाला मिळणारा ऑक्सिजन जिल्ह्यात पक्षाला बळकटी देणारा ठरतो. आगामी निवडणुका महाआघाडी (Mahavikas Aghadi) करून लढण्याला आमचे प्राधान्य असेल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली.

Dilip Khaire, NCP leader
साक्रीतील भाजपचे विजयी नगरसेवक बेपत्ता का झालेत?

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात श्री. खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या कार्यकारिणीच्या स्वतंत्र बैठका घेऊन दिवसभर कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले, नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत श्री. भुजबळ नसताना येवल्यात १० नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपद थोड्या मताने गेले होते, त्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद व लोकांच्या मनातील स्थान कायम असून आगामी निवडणुकीत सक्षमतेने सामोरे जाण्याचा विश्वास पगार यांनी व्यक्त केला. येवल्यातील पक्षाची ही ताकत जिल्ह्यातील पक्ष बळकटीकरणासाठी प्राणवायू ठरत आहे. भुजबळ साहेबांनी येवला मतदारसंघासह जिल्ह्यात कोट्यावधीची विकासकामे केली आहेत, त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगत जिल्हाभरात व्यापक सभासद नोंदणी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Dilip Khaire, NCP leader
`राष्ट्रवादी`च्या उमेदवाराच्या कुटुंबियांचा ध्वजारोहणप्रसंगी आत्मदहनाचा प्रयत्न!

पदाधिकारी सोडविणार समस्या

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुंबईत प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या. त्याअंतर्गत प्रत्येक पदाधिकारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपल्या मूळ गावी जाऊन नागरिकांच्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा महत्वकांक्षी संकल्प हाती घेतला जाणार आहे. या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागतील असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकांत आघाडीची चर्चा

स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवाव्यात असा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सूर आहे. आताही आम्ही नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या, जेथे स्थानिक पातळीवर आघाडी झाली नाही तेथे स्वबळावर लढलो. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे असेही पगार यांनी सांगितले.

यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पगार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार, अनिल बोचरे, ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com