पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत

येवला येथील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली.
NCP Meeting at Yeola
NCP Meeting at YeolaSarkarnama

येवला : येवल्यास (Yeola) जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोबतच लढणार आहे.मित्र पक्षांना सोबत घेऊन हा निर्णय घेतला जाईल, यात स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्यास स्वबळावरही लढण्याची आमची तयारी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे (Dilip Khaire) यांनी दिली. (NCP leaders planing to allince Mahavikas Aghadi colligues)

NCP Meeting at Yeola
दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

येथील भुजबळ संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार उपस्थित होते. पालिका निवडणुकीत २७ टक्के जागांवर ओबीसीचे उमेदवार दिले जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

NCP Meeting at Yeola
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचेपदाधिकारी, नगरसेवक तसेच इच्छुकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपालिका निवडणूकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी ताब्यात घेणारच असा विश्वासही सर्वांनी व्यक्त केला आहे. गेल्या सहा महिन्यापासून मतदार संघाचे निरीक्षक म्हणून दिलीप खैरे यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावल्याने त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पगार यांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीला येथील हेवीवेट नेते छगन भुजबळ अडचणीत होते. ते नसताना देखील पक्षाला सर्वाधिक दहा जागा मिळाल्या होत्या तर नगराध्यक्षपदाची संधी अवघ्या काही मतांनी हुकली होती. आता स्वतः भुजबळ साहेब असून गेल्या दोन वर्षात कोट्यावधीची विकास कामे येथे झाली आहेत. त्यामुळे नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित असल्याचा विश्वास पगार यांनी व्यक्त केला.

येथे महाविकास आघाडीला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याला आमचे प्राधान्य असेल.राज्य व जिल्हा स्तरावर हा निर्णय झाला आहे.जेथे अडचणी येतील तेथे आम्ही स्वबळावर निवडणुका लढविणार आहोत.नुकत्याच झालेल्या पाच नगरपरिषदांच्या निवडणुकीत आघाडी झाली नसली तरी नंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याकडे अधिकार देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरक्षण फॉर्म्युला जिल्हाभर

येथे यावेळी २६ जागा असून ४१ बूथ आहेत. सर्व बुथवर प्रमुखांची नेमणूक झाली असून सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याला आमचे प्राधान्य असणार आहे, किंबहुना ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला नसला तरी पक्षाच्या धोरणानुसार २७ टक्के जागेवर ओबीसी उमेदवार देण्यात येणार असून जिल्हाभर हा फॉर्म्युला राबविणार असल्याचे पगार यांनी सांगितले.

ईडी आणि चौकशीचा धाक दाखवून चुकीच्या पद्धतीने राजकारण होत आहे. जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. आगामी निवडणुकीत याचा आम्हांला फायदा होणार हे नक्की. भविष्यातले राजकारण कसे असेल हे माहीत नाही पण स्थानिक पातळीवर मात्र आजही महाविकास आघाडी सोबतच लढण्याचा आमचा विचार असल्याचे सांगतानाच येवल्याबाबत भुजबळ साहेब निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगरसेवक राजेश भांडगे, प्रवीण बनकर, ज्ञानेश्वर दराडे, मलिक शेख, मोहन शेलार, भागिनाथ पगारे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in