Onion Farmers: कांदा प्रश्नावर आक्रमक `राष्ट्रवादी` नेते उतरणार रस्त्यावर!

राष्ट्रीय महामार्गावरील उद्या चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करणार
Sameer Bhujbal
Sameer BhujbalSarkarnama

Nashik News: कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात असल्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलने होत आहेत. आता या प्रश्नावर विधीमंडळात आवाज उठवणारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असुन उद्या (ता.10) मुंबई राष्ट्रीय महामार्गावर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची घोषणा पक्षाने केली आहे. (NCP aggressive on onion issue will block road)

या प्रश्नावर विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक आंदोलन केले आहे. अद्यापही राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणावर शेतकरी संतप्त आहेत. याबाबत काँग्रेस, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस उद्या चांदवड येथे महामार्गावर रास्ता रोको करणार आहे.

Sameer Bhujbal
Nashik News: विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (ता. १०) सकाळी दहाला चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे.

कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसेच भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई –आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथे रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे.

Sameer Bhujbal
Maharashtra Budget Session: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प : लोकप्रिय घोषणा होणार? काय आहेत शक्यता?

कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दयावा आदी मागण्यासाठी करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात नेते, शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com