राज ठाकरेंना इशारा... तर हातातल्या बांगड्या काढायाल वेळ लागणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला.
Raj Thakre & Anita Bhamre News, Anita Bhamre on Raj Thackeray News
Raj Thakre & Anita Bhamre News, Anita Bhamre on Raj Thackeray News Sarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करतात अशी विचारहीन टीका राज ठाकरे (Raj Thakre) यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे करीत आहेत ते म्हणजे, `निवडणूकांच्या तोंडावर जातीपातीचे हेच का ते अभद्र राज-का-रण` असा टोला त्यांनी लगावला आहे. (Anita Bhamre replied to Raj Thackeray)

Raj Thakre & Anita Bhamre News, Anita Bhamre on Raj Thackeray News
..आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत

याबाबत त्या म्हणाल्या, दोन वर्षांपासून संपूर्ण देशाला कोरोना सारख्या रोगाने कवेत घेतले होते. आता कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे जनतेने महाराष्ट्रात गुढीपाडवा आनंदात साजरा करीत असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. निवडणूका आल्या की विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी पोटशूळ उठतो.

Raj Thakre & Anita Bhamre News, Anita Bhamre on Raj Thackeray News
श्रीराम रथोत्सवात राहुल ढिकलेंनी टाळली `शहादा` प्रकरणाची पुनरावृत्ती!

त्या म्हणाल्या, झाले असे कि मनसेच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्रात शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात अशी टीका ठाकरे यांनी केली. राज ठाकरे असो किंवा विरोधी पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे भाषणच पूर्ण होत नाही. किमान राज ठाकरेंनी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासूनचा अभ्यास केला पाहिजे होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षात अनेक जातींचे नेते स्वकर्तृत्वाने प्रमुख पदांवर विराजमान आहेत.

शरद पवार यांनी पक्षातील अनेक कर्तृत्ववान मराठा समाजाच्या नेत्यांना विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांना इतर समाजाला संधी देतांना दोन पाऊले माघारी रहावे लागते. हे पक्षाचे धोरण आहे. यास्तव मराठा समाज देखील कधी कधी नाराज होतो तरी श्री. पवार पक्षाच्या विचांरापासून तसूभरही मागे हटत नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. राज ठाकरे आता सर्वसामान्य जनता केवळ विकासाला मानते. आम्हीही हिंदू आहोत म्हणून इतर धर्माचा नाहक विरोध करत नाही. आपण धर्माभिमानी आहात म्हणून कृपा करून आमच्या स्वाभिमानी नेतृत्वावर टीका नको नाही तर राष्ट्रवादीच्या महिलांना हातातल्या बांगड्या काढायला वेळ लागणार नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com