महाविकास आघाडी विरोधात `राष्ट्रवादी`ने फडकवला नाराजीचा झेंडा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी स्थानिक पातळीवर जनतेची कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.
महाविकास आघाडी विरोधात `राष्ट्रवादी`ने फडकवला नाराजीचा झेंडा
NCP Jayant Pawar, MalegaonSarkarnama

मालेगाव : शासकीय कार्यालयात सामान्य जनतेचे प्रश्‍न सुटत नाहीत. जनतेत पक्षाबद्दल नाराजीचा सूर उमटू शकेल. (People are unhappy doue no devolopment issues resolve) त्यामुळे आगामी बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची (NCP will go alone for all upcoming elections) तयारी कार्यकर्त्यांनी करावी. पक्ष संघटन वाढीसाठी संपर्क अभियान राबवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार (Dt Jayant Pawar) यांनी केले.

NCP Jayant Pawar, Malegaon
पांडेजी म्हणतात, `नो हेल्मेट, नो पेट्रोल` नंतर नाशिकमध्ये `नो होर्डिंग`

येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष संदीप पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी आगामी निवडणुकांसह तालुक्यात पक्ष विस्तारासंदर्भात चर्चा करण्यात आली. डॉ. पवार म्हणाले, की तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. मात्र, राज्यात सत्ता मिळूनदेखील स्थानिक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने त्यांची कोंडी होत आहे.

NCP Jayant Pawar, Malegaon
काँग्रेसने उधळले, एकनाथ खडसे- गिरीश महाजनांचे राजकीय इमले

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्याच पदरी पडत आहेत. शिवसेनेचे कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला विश्‍वासात घेत नाहीत. योजनांच्या लाभापासूनदेखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वंचित राहावे लागत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील संपर्क दौऱ्यात सत्ता मिळाली तरी कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे, याची कबुली दिली होती. त्यामुळे तालुक्यात चित्र बदलण्यासाठी आत्ताच सावध होत आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची गरज डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

तालुकाध्यक्ष संदीप पवार, प्रकाश वाघ, मनमोहन शेवाळे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीला किशोर इंगळे, बाळू वाणी, विजय पवार, राजेंद्र पवार, सतीश पवार, महिला अध्यक्षा हेमलता मानकर, महेश शेरेकर, तांबोळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बूथ कमिट्या स्थापणार

स्वबळावर निवडणुका लढल्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संधी मिळण्याबरोबर घराघरांत पक्ष पोचू शकणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयाची निश्‍चित संधी मिळू शकेल. पक्ष विस्तारासाठी बूथ कमिट्यांची स्थापना करत कार्यकर्ता नोंदणी, तसेच जनतेपर्यंत पोचून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. तालुक्याचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्याला वेळ देण्याची गरज डॉ. पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.