राष्ट्रवादी म्हणते, आयकर नव्हे ‘भाजप आयकर विभाग’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र शासनाविरूध्द आंदोलन करीत आमच्यावरही आयकर विभागाने छापे टाकावे असे आव्हान दिले.
राष्ट्रवादी म्हणते, आयकर नव्हे ‘भाजप आयकर विभाग’
NCP agitaion against It DepartmentSarkarnama

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या बहिणींच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापे टाकले. (IT scrutiny at Ajit pawar`s sisters offices) श्री. पवार यांच्या व त्यांच्या मालमत्तांची चौकशी होणे समजू शकतो मात त्यांच्या बहिणींना त्रास देणे हा राजकीय हतबलतेचा भाग आहे. याप्रकरणी केंद्र शासनाचा धिक्कार (NCP women wing protest the IT Action) करीत शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला.

NCP agitaion against It Department
शिवसेनेचे महानगरप्रमुख कचऱ्याचे कंत्राटदार ‘वॉटरग्रेस’चे भागीदार

येथील राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने आयकर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आयकर कार्यालयाचे ‘भाजप आयकर विभाग’ असे नामकरण करून, त्याचे प्रतिकात्मक उद्‌घाटनही करण्यात आले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पित पाटील यांनी नेतृत्व केल

NCP agitaion against It Department
मनसे म्हणते युती करू...भाजपचे मात्र तोंडावर बोट!

महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, अर्बन सेलच्या अध्यक्षा अश्‍विनी देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष कल्याणी राजपूत, सरचिटणीस स्नेहल शिरसाठ, प्रतिमा शिरसाठ, मुविकोराज कोल्हे, जुबेर खाटीक, प्रविण महाजन आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आम्हीही बहिणी आहोत आयकर विभागाने आमच्यावरही धाडी टाकाव्यात. श्री. पवार यांच्या कुटूंबीयांवर धाडी टाकून आयकर विभाग भाजपच्या दबावाला बळी पडतो आहे, असे यातून दिसते.

Related Stories

No stories found.