‘राष्ट्रवादी’साठी भाजपला अंगावर घेणारा दमदार जिल्हाध्यक्ष देऊ!

धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत निरिक्षक अर्जुन टिळे यांनी संवाद साधला.
‘राष्ट्रवादी’साठी भाजपला अंगावर घेणारा दमदार जिल्हाध्यक्ष देऊ!
Arjun Tile, NCP leaderSarkarnama

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ग्रामीण जिल्हाध्यक्ष (Dhule) किरण शिंदे (Kiran Shinde) यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्ष संघटन आणखी मजबूत करणारा, नियमित जिल्हा दौऱ्यातून पक्ष भरभक्कम करणारा दमदार जिल्हाध्यक्ष देऊ, असे पक्ष पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे (Arjun Tile) यांनी सांगितले.

Arjun Tile, NCP leader
दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची चाचपणी झाल्यावर प्रदेशाध्यक्षांसह उपमुख्यमंत्र्यांना दोन दिवसांत अहवाल सादर करू. जिल्हाध्यक्ष निवडीत गटा- तटाला बिलकूल थारा दिला जाणार नाही, अशी भूमिका श्री. टिळे यांनी मांडली.

Arjun Tile, NCP leader
पंकज भुजबळांना धक्का देण्यासाठी सुहास कांदे यांनी आणले दोन आमदार!

राष्ट्रवादीच्या येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी श्री. टिळे दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. ज्येष्ठ एन. सी. पाटील, शहराध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण शिंदे, किरण पाटील, सुमीत पवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष पदासाठीचे इच्छुक उपस्थित होते.

व्हीजन असणे गरजेचे

श्री. टिळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक स्तरावर गटा- तटाला थारा दिला जाणार नाही. किंबहुना, पक्षात गट-तट मानत नाही. राष्ट्रवादीत एकच गट असून तो राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांचा आहे. त्यांना मानणारा, राष्ट्रवादीला जिल्ह्यात भरभक्कम करणारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिला जाईल. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही. असे असताना पक्ष संघटन वाढेल कसे? पक्ष मजबूत होईल कसा? यासंबंधी व्हीजन असणाऱ्या दमदार व्यक्तीची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड केली जाईल. यातही सर्वानुमते निवडीवर भर राहील.

जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस असणे चांगले आहे. इच्छुकांची चाचपणी झाल्यावर अहवाल सादर करू, त्यावर प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असे श्री. टिळे यांनी नमूद केले. श्री. टिळे यांनी राष्ट्रवादी भवनातील बंद दालनात काही कार्यकर्ते, गटांशी संवाद साधला. इच्छुकांशी गाठभेट झाल्यावर त्यांच्याशीही संवाद साधला. त्यांची भूमिका जाणण्यासाठी दौऱ्यावर आल्याचे श्री. टिळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

राजीनामा दिला तरी किरण शिंदे यांनी पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी साक्री तालुक्यातून सुरेश सोनवणे, जितेंद्र मराठे, नरेंद्र तोरवणे, पोपटराव सोनवणे, शिरपूर तालुक्यातून डॉ. जितेंद्र ठाकूर, मनोज महाजन, दिनेश मोरे, शिंदखेडा तालुक्यातून संदीप बेडसे, सत्यजित शिसोदे, ॲड. एकनाथ भावसार, धुळे तालुक्यातून किरण पाटील, राजेंद्र चितोडकर, प्रशांत भदाणे इच्छुक आहेत.

भाजपला अंगावर घेणारा हवा

विरोधक भाजपला अंगावर घेणारा, इतर पक्षापासून अंतर राखणारा, बी टीम म्हणून भाजपशी आतून संबंध न ठेवणारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिला जावा, असे काही कार्यकर्त्यांनी श्री. टिळे यांना खासगी चर्चेत सांगितले. तसेच पक्षातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्याला या पदावर संधी दिली जावी, अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.