`राष्ट्रवादी`च्या तयारीवर पाणी...बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर!

प्राधिकरणाकडून मतदारयादीचा कार्यक्रम रद्द केल्याने सोसायटीच्या निवडणुकांना मुहूर्त लागला.
`राष्ट्रवादी`च्या तयारीवर पाणी...बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर!
Devidas Pingle & Dilip BankarSarkarnama

येवला : बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा प्रशासकीय अडचणीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांनंतरच बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया घेणे उचित राहणार असल्याने सध्या सुरू असलेली बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी काढले आहे.

Devidas Pingle & Dilip Bankar
कायदे मागे घेतले, पण शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या धोरणाचे काय?

जिल्ह्यातील बाजार समित्याची मुदत यापुर्वीच संपली आहे. त्याला मुदतवाढ मिळाली होती. यामध्ये नाशिक, येवला व नांदगाव ( १९ ऑगस्ट २०२०), कळवण (२८ ऑगस्ट २०२०), चांदवड ( १६ ऑगस्ट २०२०), पिंपळगाव बसवंत (२ ऑगस्ट २०२०), सिन्नर (२० ऑगस्ट २०२०), लासलगाव (मे २०२१) आणि मालेगाव (मार्च २०२१) यांचा समावेष आहे. त्यात नाशिक, पिंपळगाव, लासलगाव. चांदवड या प्रमुख समित्या राजकीय हालचालींचे केंद्र आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल या नेत्यांनी सर्व तयारी केली होती. आता ही तयारी वाया गेली आहे. त्यांच्या समर्थकांच्या उत्साहावर विरजन पडले.

Devidas Pingle & Dilip Bankar
बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!

जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजार समित्यांची मुदत संपत आली आहे. प्राधिकरणाने मागील महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून मतदार यादीचा कार्यक्रम देखील सुरू केला होता. काही बाजार समित्यांवर सध्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे तर काहींवर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाने तयारी सुरू केली होती. बाजार समित्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्यावर आक्षेप, हरकतीही मागविण्यात आल्या होत्या. मात्र सहकारी संस्थांची निवडणूक झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे चुकीचे होईल अशी मागणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे करण्यात आली होती. सोसायट्यांचे संचालक बाजार समितीच्या निवडणुकीत सहभागी होऊ शकत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. न्यायालयाने देखील ही बाब मान्य केल्याने या निवडणुका होणार की नाही याकडे लक्ष लागले होते.

अखेर निवडणूक प्राधिकरणाने स्वतंत्र आदेश काढून निवडणुकीसह मतदार यादीची प्रक्रिया रद्द केली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासंदर्भात प्राधिकरणाकडून स्वतंत्र आदेश काढले जातील असे प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी या पत्रात म्हटले आहे. यामुळे निवडणुकीच्या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे काय हा सुरू असलेला संभ्रम निकाली निघाला आहे. संचालक मंडळासह प्रशासकीय मंडळाला देखील आता सहाजिकच मुदतवाढ मिळाली आहे

...

प्राधिकरणाच्या पत्रानंतर बाजार समितीची मतदारयादीची प्रक्रिया सुरू झाली होती. पुन्हा निवडणूक रद्दचे आदेश आल्याने प्राधिकरणाच्या सूचनेनुसार निवडणूक घेण्यासाठी बाजार समिती तयार आहे. आमची सर्व तयारी झाली आहे.

- माजी खासदार देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in