‘मला शिरपूर तालुका भाजपमय करायचा’

अमरिशभाई पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीसह विविध कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
Amrishbhai Patel
Amrishbhai PatelSarkarnama

शिरपूर : शिरपूर (Dhule) तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी (Devolopment) प्रयत्नशील आहे. हा तालुका शंभर टक्के भाजपमय (BJP) करायचा आहे, असे आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी सांगितले. (Amrishbhai Patel said i want to make Shirpur BJP castle)

Amrishbhai Patel
...जेव्हा मंत्री दादा भुसे दरोडेखोराला पकडायला जातात!

आमदार पटेल यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती वसंत पावरा, उपसभापती विजय बागूल व इतरांचा सत्कार झाला.

Amrishbhai Patel
आयुक्त म्हणतात, ‘महापालिकेची गंगाजळी वाढू दे’

आमदार पटेल म्हणाले, की आमच्या परिवाराने नेहमीच मनापासून तालुक्याची सेवा केली असून, ती परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. मी तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देतो. शिरपूर पॅटर्नमधून आतापर्यंत ३३० बंधारे पूर्णपणे बांधले असून, यामुळे भूजल पातळी वाढली आहे.

आतापर्यंत तालुक्यात २० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचन खाली आणली आहे. अरुणावती नदीचे पाणी तापी नदीपर्यंत अनेक बंधारे बांधून अडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अत्याधुनिक शैक्षणिक दालनेही उभे केले असून हजारो विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबांना सुखसंपन्न केले आहे. हजारो युवकांना रोजगार उपलब्ध केला असून, भविष्यात हे काम सुरूच राहील.

श्री. जाधव म्हणाले, की आमदार अमरिशभाई पटेल यांनी जिल्ह्यात अनेकांना राजकीय क्षेत्रात न्याय दिला. भूपेशभाई पटेल यांनी आरोग्य सेवेत पूर्णपणे वाहून घेतले आहे. अमरिशभाईंच्या नेतृत्वात शत-प्रतिशत भाजप यशस्वी होत राहिल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, रमाकांत पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, मिलिंद पाटील (हिंगोणी), पंचक्रोशीतील अनेक गावांतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी आमदार काशीराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा बँक संचालक प्रभाकर चव्हाण, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, वसंत पावरा, उपसभापती विजय बागूल, सरपंच मंजूळाताई पाटील आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in