तुम्ही शिवसैनिक तर, आम्ही काय बांगडया भरल्यात काय?

आमदार सरोज अहिरे माझ्या कार्यकाळात व माझ्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेत भूमीपूजन करीत आहेत.
तुम्ही शिवसैनिक तर, आम्ही काय बांगडया भरल्यात काय?
MLA Saroj Gholap & Ex MLA Yogesh GholapSarkarnama

नाशिक : भूमीपूजन केलेल्या सर्व कामांचे श्रेय माझेच आहे. ( MLA Saroj ahire) माजी आमदार घोलप (Shivsena`s Ex MLA Yogesh Gholap) यांच्या पराभवाचा सर्वाधिक आनंद शिवसैनिकांनाच झाला होता. (Shovsena workers are much happy after Gholap`s Defeat) त्यामुळे त्यांच्या मनात जरी कार्यक्रम उधळण्याचा विचार येत असेल, स्वतःला शिवसैनिक समजत असतील तर आम्ही देखील आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, (Ncp 7 I also not wear a bangles) असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज दिले.

MLA Saroj Gholap & Ex MLA Yogesh Gholap
गारपीटग्रस्तांना भरपाई; राज्यासाठी १२२ तर नाशिकला सर्वाधिक ५९ कोटी

शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी गुरुवारी आमदार सरोज अहिरे माझ्या कार्यकाळात व माझ्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेत आहेत. त्याचे भूमीपूजन करीत आहेत. यापुढे त्यांनी असे केले तर शविसेना त्यांचे कार्यक्रम उधळून लावेल, असा इशारा दिला होता. यासंदर्भात आमदार अहिरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

MLA Saroj Gholap & Ex MLA Yogesh Gholap
गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य!

त्या म्हणाल्या, ५१ कोटींच्या कामांचे भूमीपूजन झाले. त्यातील दहा कोटींची कामे त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झाली असा श्री. घोलप यांचा दावा आहे. मात्र काम मंजूर करणे याचा अर्थ काम झाले असा नव्हे. हे त्यांना ज्ञात नसावे. त्यांचे मत समजल्यावर मला आश्चर्य वाटले. त्यासाठी निधी कोणी आणला. १ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सडक योजनेचे एशियन डेव्हलोप बँकेच्या प्रकल्पातंर्गत निविदा प्रक्रीया होऊन ७ ऑक्टोबरला निविदा राबविण्याची मंजूरी मिळाली. त्यानंतर तो निधी वर्ग झाला. तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. २३ मार्चला कामाची ऑर्डर झाली. तेव्हा तुम्ही आमदार होते का?. त्यासाठी आमदार म्हणून मी प्रयत्न केले. त्याबाबत माजी आमदारांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला देखील दिला.

मी केलेल्या कामाचे श्रेय मला अजिबात नको. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील वा पालकमंत्री छगन भुजबळ असो त्यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम केले. त्यातून मी आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र श्री. घोलप यांच्या पाय खालची वाळू सरकू लागल्याने ते आरोप करीत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, आचारसंहिता लागल्याने दहा कोटींच्या कामाचे भूमीपूजन करू शकोल नाही, असा दावा माजी आमदारांनी केला आहे. मात्र कोणत्याही कामाचा कार्यरंभ असल्याशिवाय भूमिपूजन केले जात नाही. त्यांनी ऑक्टोबर २०१९ आधीची वर्क ऑर्डर दाखवावी, मगच कामे केल्याचा दावा करावा. कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कामांचे असेच आहे. ती कामे २०१८ मध्ये मंजूर झाल्याचा त्यांचा दावा हास्यास्पद आहे. नाशिक साखर कारखान्याबाबत देखील ते असेच करीत आहे. याबाबत माजी आणदारांनी सहकार मंत्र्यांशी एक जरी पत्रव्यावहार केला असेल तर तो जनतेपुढे सादर करावा. उगाच मढ्यावरचे लोणी खाण्याची सवय सोडावी.

...

Related Stories

No stories found.