नितीन पवार यांनी आणले कालव्यांसाठी १५० कोटी!

कळवण मतदारसंघातील चणकापूर, सुळे, सुपले कालव्यांतील कामांना मिळाली प्रशासकीय मान्यता.
Nitin Pawar News, Nashik Latest Marathi News, Kalwan latest Marathi News
Nitin Pawar News, Nashik Latest Marathi News, Kalwan latest Marathi NewsSarkarnama

कळवण : सिद्धेश्वर बंधाऱ्याची उंची (Irrigation) वाढविण्याबरोबर सुळे उजव्या कालव्यातील त्रुटी व इतर कालव्यावरील कामांसाठी व भूसंपादन मोबदल्यासाठी शासनाने (Maharashtra Government) १५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्या मुळे दहा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, तालुक्यातील पाणीप्रश्न सुटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी दिली. (150 cr. Fund allocation for Nitin Pawar`s constituency)

Nitin Pawar News, Nashik Latest Marathi News, Kalwan latest Marathi News
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

१५० कोटींपैकी ४२ कोटी रुपये संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे. ११८ कोटींची विविध कामे होणार असून, त्यात सिद्धेश्वर बंधाऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुळे व सुपले कालव्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोचून सिंचनाचा लाभ होणार आहे. सुळे उजवा कालवा पूर्ण क्षमतेने वाहत नसल्याने व कालव्याचा बहुतांश भागात सर्वसाधारण खोदाईच्या भागात पाइप टाकून कालवा बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्यावरील पिंपळे, रवळजी, मोकभणगी, देसराने, पाडगन, इशी, पाटविहारे, नाकोडा आदी गावांतील ६९७ हेक्टर सिंचन क्षेत्रातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे.(Nashik Latest Marathi News)

Nitin Pawar News, Nashik Latest Marathi News, Kalwan latest Marathi News
संजय शिरसाठ म्हणाले, `आता फक्त एकनाथ शिंदे हेच नेते`

सुळे उजव्या कालव्याच्या वितरण प्रणालीसाठी बंदिस्त पाइपाद्वारे चाऱ्यांची कामे होणार असून, २७३ हेक्टर क्षेत्रात सिंचनाची वाढ होणार आहे.

सुपले उजवा कालवा डोंगराच्या कडेकडेने जात असून, पाण्याची गळती होते. कालव्याच्या सर्वसाधारण खोदाईच्या भागात गाळ साचल्यामुळे कालवा पाइपाने बंदिस्त करून व कालवा गळतीच्या ठिकाणी काँक्रिट लायनिंग करून कालव्याद्वारे २८३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. त्याचा प्रतापनगर, काठरेदिगर, सुपळेदिगर, जयदर या गावांना फायदा होणार आहे. सुपले डावा व सुळे डावा कालव्यांचे आवश्यक दुरुस्ती होणार आहे. शेरी, भैताणे, सावरपाडा, गणोरे, देसराणे, धणेर, ककाणे, बिजोरे, विसापूर, पिंळकोस आदी गावातील, तसेच चणकापूर उजवा कालव्यातील आवश्यक दुरुस्ती करून कळवण तालुक्यातील निवाणे, भेंडी, मानूर गावातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

सुळे उजव्या कालव्याचा प्रश्न शासन स्तरावर दुर्लक्षित होता. शेतकऱ्यांना कालव्याचा फायदा होत नसल्याचे जलसंपदा विभागाच्या बैठकीत लक्षात आणून दिल्यानंतर त्याविषयी बैठकीत चर्चा झाली. सप्टेंबर २०२० मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंताबरोबर कालव्याची पाहणी केल्यानंतर शासनाला वस्तुनिष्ठ अहवाल सादर झाल्यानंतर शासनाने १५० कोटी रुपयांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

-नितीन पवार, आमदार, कळवण

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in