आमदार कोकाटेंना धक्का; आधी ग्रामपंचायत आता सोसायटीत पराभव!

सोनांबे (सिन्नर) सोसायटी निवडणुकीत विजयानंतर जनसेवा पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला.
Rajabhua Waje & Manikrao Kokate News, Rajabhua Waje Vs Manikrao Kokate News, Sinnar Politics News, Nashik Politics News
Rajabhua Waje & Manikrao Kokate News, Rajabhua Waje Vs Manikrao Kokate News, Sinnar Politics News, Nashik Politics News Sarkarnama

सिन्नर : सिन्नर (Sinner) मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या ताब्यातील विविध सत्ताकेंद्रे खालसा होऊ लागली आहेत. माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhua Waje) समर्थकांनी आधी सोनांबे ग्रामपंचायत व काल झालेल्या निवडणुकीत सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला. (Rajabhua Waje Manikrao Kokate News)

Rajabhua Waje & Manikrao Kokate News, Rajabhua Waje Vs Manikrao Kokate News, Sinnar Politics News, Nashik Politics News
महाविकास आघाडीचे आणखी २ मंत्री अडचणीत; अस्लम शेख, वर्षा गायकवाडांवर गुन्हा दाखल

सोनांबे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तापरिवर्तन होऊन माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक सरपंच डॉ. रवी पवार यांच्या जनसेवा पॅनलने तेरा पैकी १२ जागा जिंकल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार यांची सोसायटीतील सत्ता संपुष्टात आणली. ग्रामपंचायतपाठोपाठ सोसायटीतही परिवर्तनामुळे आमदार माणिकराव कोकाटे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Rajabhua Waje & Manikrao Kokate News, Rajabhua Waje Vs Manikrao Kokate News, Sinnar Politics News, Nashik Politics News
गुडन्यूज! वर्षाला ३ LPG सिलेंडर मिळणार मोफत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सोनांबे सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनल तर त्यांच्याविरोधात सरपंच डॉ. पवार यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलची मोट बांधली होती. गावातील ज्येष्ठ व तरुणांना एकत्र करत सर्वांच्या सहमतीने डॉ. पवार यांनी उमेदवार दिले होते.

निवडणूक प्रक्रियेत विशेष मागास प्रवर्ग गटातून रामभारती गोसावी हे जनसेवा समर्थक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी दोन्ही पॅनलमध्ये लढत झाली. रविवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणीअंती जनसेवा पॅनलने बाजी मारत अकरा जागा जिंकल्या. समर्थला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती-जमाती गटातून गोविंद डगळे हे एकमेव उमेदवार समर्थकडून विजयी झाले.

सर्वसाधारण गटातून जनसेवाचे पंडित घोडे, रामनाथ डावरे, तानाजी पवार, शुभम पवार, ज्ञानेश्वर बोडके, ज्ञानेश्वर पवार, प्रवीण पवार, सुरेश पवार विजयी झाले. इतर मागास प्रवर्ग गटातून खंडू पवार तर महिला राखीव गटातून राधाबाई पवार, द्रौपदाबाई बोडके यांनी प्रतिस्पर्धींना पराभूत केले. चंद्रभान पवार, सोपान पवार, एकनाथ पवार, संजय बोडके, दामू बोडके, विष्णू डगळे, भाऊसाहेब पवार, दशरथ पवार, शरद रत्नाकर, सुभाष जोर्वे, विकास पवार, अनिल पवार, भगवान पवार, संतोष डगळे, योगेश पवार आदींनी जनसेवा पॅनलला विजयासाठी परिश्रम घेतले.

पहिले ग्रामपंचायत, आता सोसायटी

गावातील तरुणांनी एकत्र येत डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावेळेला ग्रामपंचायतीच्या सर्व अकरा जागा जिंकून घेत केरू पवार गटाला अनपेक्षित हादरा दिला होता. आताही सोसायटीत सत्ताहरण करून प्रस्थापित गटाला पराभवाची धूळ चारली आहे. सिन्नरच्या पश्चिम भागातील सोनांबे हे राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर या जय पराजयाचा परिणाम होणार हे नक्की.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com