राष्ट्रवादीच्या सदस्याच्या पाठिंब्याने भाजपच्या वंदना ईशी सभापती !

आमदार जयकुमार रावल यांनी राखला भाजपचा शिंदखेडा पंचायत समितीचा बालेकिल्ला
Jaykumar Rawal with newly elected Sabhapati
Jaykumar Rawal with newly elected SabhapatiSarkarnama

शिंदखेडा : शिंदखेडा पंचायत समितीच्या (Shindkheda Panchayat Samiti) सभापतिपदी वंदना ईशी (Vandana Ishi) व उपसभापतिपदी रणजितसिंह गिरासे (Ranjisingh Girase) यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने भाजप (BJP) नेते आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) एका सदस्याने चक्क भाजपला (BJP) पाठींबा दिला. (NCP member supports BJP in Shindkheda Committee)

Jaykumar Rawal with newly elected Sabhapati
Eknath Khadse: जळगावच्या पोलिसांनी संशयित आरोपींना पळवले!

यावेळी सभापती अनिता पवार व उपसभापती राजेश पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सभापती आणि उपसभापदिपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत ईशी यांच्या पत्नी वंदना ईशी यांनी, तर उपसभापतिपदासाठी भाजपचे रणजितसिंह गिरासे यांनी उमेदवारी अर्ज केले. त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी जाहीर केली.

Jaykumar Rawal with newly elected Sabhapati
नंदुरबारला पुन्हा फडकला एकनाथ शिंदेंचा झेंडा!

भाजपच्या वैशाली पाटील, अनिता पवार, छायाबाई गिरासे, नंदिनी कोळी, राजेश पाटील, रणजित गिरासे, वंदना कोळी, पुष्पाबाई रावल, नारायणसिंह गिरासे, दीपक मोरे, प्रवीण मोरे, पंडित बोरसे, भागबाई भिल, चंद्रकला भिल, दुल्लभ सोनवणे, राष्ट्रवादीचे सदस्य भगवान भिल उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे चार सदस्य अनुपस्थित होते. निवडीनंतर आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करून त्यांना पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. कामराज निकम, अनिता पवार, राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे, वीरेंद्रसिह गिरासे, महावीरसिंह रावल, पंकज कदम, डी. आर. पाटील, धनंजय मंगळे, जिजाबराव सोनवणे, नरेंद्र गिरासे, मोतीलाल कोळी, डी. एस. गिरासे, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडेयांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या सदस्याचा भाजपला पाठिंबा

सद्यस्थितीत शिंदखेडा पंचायत समितीत भाजपचे १४ सदस्य आहेत. एक अपक्ष व ५ सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. त्यातील अपक्ष व राष्ट्रवादीच्या एका सदस्याने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपला १६ सदसस्यांचा पाठिंबा आहे. वारुड गणाचे राष्ट्रवादीचे सदस्य भगवान भिल यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यांचा सत्कार आमदार रावल यांनी केला. निवडीनंतर भाजपकडून मोठा जल्लोष पंचायत समितीच्या आवारात करण्यात आला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com