राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे मिटकरींची तक्रार केली!

आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे मिटकरींची तक्रार केली!
Amol Mitkari, NCPSarkarnama

सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण (Bramhan Community) समाजाच्या भावना दुखावल्याने आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. ब्राह्मण समाज कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहे. ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता. ब्राह्मण समाजाने पक्षाच्या भुमिकेबद्दल कोणताही गैरसमज करू नये, असे आवाहन सटाणा (Satana city) शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

Amol Mitkari, NCP
पोलिसांना आता ८ तासांची ड्यूटी अन् १ लाख घरे!

याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधी, वैदिक मंत्र, समाजाविषयी केलेल्या वक्तव्याने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचार व आदर्शांनुसार काम करणारा पक्ष असून, जात-पात- धर्म यात भेद करणे पक्षाच्या अंगालाही शिवणारे नाही.

Amol Mitkari, NCP
भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व हे सर्व जाती- धर्मातील लोकांना न्याय देण्याचे असून, त्यांनी पक्षात सर्व जाती- धर्माच्या लोकांना स्थान देऊन सामाजिक ऐक्य जोपासले आहे. ब्राह्मण समाजाविरोधात पक्षाची कोणतीही भूमिका नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून आमदार मिटकरी बोलतही नव्हते. मिटकरी यांनी लग्न लावतानाची जी प्रक्रिया असते त्या बद्दलचा मंत्रोच्चार केला होता. त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केले, त्यावर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ त्यांना भाषण थांबवण्यासही सांगितले होते.

ब्राह्मण समाजाने प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून कायम सहकार्यही केले आहे. मिटकरी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून, आपले मत व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मात्र, आमदार मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल पक्षातर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकावर माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.