
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात अनेक जुन्या जाणत्या नेत्यांनी एकत्र येत शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्धार केला आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची (शरद पवार) गटाची जम्बो कार्यकारिणी ॲड. माणिकराव शिंदे यांनी जाहीर केली. त्यामुळे मतदारसंघात मोठे संघटन उभे केले आहे. (Adv. Manikrao Shinde announce a new working committee for yeola)
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाने आपला जम बसवायला सुरवात केली आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महानंदचे सुभाष निकम यांची मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, तर ज्येष्ठ नेते विठ्ठल शेलार यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या स्नूषा कालिंदी पाटील यांची महिला तालुकाध्यक्षपदी, तर व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली.
जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. शरद पवार यांना अनेक शिलेदार सोडून गेल्यानंतर येवल्यात झालेल्या सभेने राज्यात श्री. पवार यांची ताकद दाखविली आहे.
यापुढेही हा मतदारसंघ भक्कमपणे एकोप्याने पवारांचा पाठीमागे उभा राहील. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल, असा विश्वास माणिकराव शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
युवा नेते ॲड. शाहू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी युवक उपजिल्हाध्यक्षपदी येथील दीपक लाठे, तर युवक तालुका कार्याध्यक्षपदी साईनाथ मढवई, उपाध्यक्षपदी अशोक सोमासे, भरत धनगे, सरचिटणीसपदी सचिन कड, तर तालुका संघटकपदी भूषण दाभाडे यांची नियुक्ती केली. या पदाधिकाऱ्यांना शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.