राष्ट्रवादीचे नेते यतीन पगार यांना न्यायालयाचा दिलासा

माजी आमदार दीपिका चव्हाण यांना शिविगाळ केल्याच्या ऑडिओ क्लीप प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर.
Yatin Pagar News, Deepika Chavan News, Nashik News
Yatin Pagar News, Deepika Chavan News, Nashik NewsSarkarnama

सटाणा : जायखेडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य यतीन पगार (Yatin Pagar) यांनी ठाकूर समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि ठाकूर समाजाच्या महिला लोकप्रतिनिधींना शिवीगाळ केल्याची ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर महेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी पगार यांच्याविरोधात दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मालेगावच्या जिल्हा सत्र न्यायालयाने यतीन पगार यांना अटकपूर्व (Anticipatory bail) जामीन मंजूर केला आहे. (NCP leader Yatin Pagar get relief by court in Atrocity case)

Yatin Pagar News, Deepika Chavan News, Nashik News
आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, भुजबळांची लाज काढली!

काही दिवसांपासून सोशल मीडियात जिल्हा परिषेचे माजी सदस्य यतीन पगार यांची फोनवरील तब्बल ५५ मिनिटांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. या ऑडियो क्लीपमध्ये पगार यांनी ठाकूर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण, दिवंगत माजी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांना शिवीगाळ केल्याचे आढळले होते. (Yatin Pagar News)

Yatin Pagar News, Deepika Chavan News, Nashik News
साक्रीच्या राजकारणात रोहित पवारांची एंट्री?

त्यानंतर महेश चव्हाण (रा. नामपूर, ह.मु. नाशिक) यांनी यतीन पगार यांच्याविरोधात सटाणा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून सटाणा पोलिसांनी पगार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, यतीन पगार यांनी मालेगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी राजकीय दबावाखाली हा गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद पगार यांचे वकील सुधीर अक्कर यांनी केला. तुम्ही कोणत्याही व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंग करून ती जगजाहीर करू शकत नाही. मुळात कॉल रेकॉर्डिंग करणे हाच गुन्हा असून, त्याआधारे ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा सवालही ॲड. अक्कर यांनी उपस्थित केला.

त्यामुळे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी कॉल रेकॉर्डिंग ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावा ग्राह्य धरले जाऊ शकत नसल्याने पगार यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in