राष्ट्रवादीच्या महापौर घराला `हिजाब` समर्थक `मुस्कान`चे नाव देणार!

पोलिसांच्या मनाई नंतरही मालेगावला महिलांचे `हिजाब`ला मिळाले समर्थन
Student Muskan & malegaon Mayor Tahera shaikh
Student Muskan & malegaon Mayor Tahera shaikh

मालेगाव : कर्नाटकमध्ये (Karnataka) महाविद्यालयीन ड्रेस कोडच्या निषेधार्थ जमियत उलेमा-ए-हिंदतर्फे शहरात गुरुवारी हिजाबचे (Hijab) समर्थन करण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला. जमियत उलेमा-ए-हिंदने शुक्रवारी येथे हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील (Malegaon) पूर्व भागातील मुस्लिम महिलांकडून प्रतिसाद मिळाला.

Student Muskan & malegaon Mayor Tahera shaikh
आता आमदारांनीच भाजप नगरसेवकांचे पक्षांतर रोखावे!

शुक्रवार बाजाराचा दिवस असल्याने महिला हिजाब घालूनच बाहेर पडत होत्या. दरम्यान, हिजाब दिवस पाळण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Student Muskan & malegaon Mayor Tahera shaikh
सोशल मिडीयाद्वारे युवकांना भ्रमीत करणाऱ्या भाजपपासून सावध व्हा!

हिजाबचे समर्थन करण्यासाठी, कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ अजीज कल्लू स्टेडियमच्या आवारात गुरुवारी महिला मेळावा झाला. मेळाव्यात हजारोंच्या संख्येने महिला हिजाब-बुरखा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकमधील आंदोलनाला पाठिंबा व भाजप शासनाचा निर्णय रद्द करावा, यासाठी हा महिला मेळावा झाला. शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील पूर्व भागातील विविध प्रभागांतील महिलांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. बहुसंख्य महिलांनी हिजाब-बुरखा परिधान केला होता. दरम्यान, पोलिसांची परवानगी न घेता महिला मेळावा घेतल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई उमेश खैरनार यांच्या तक्रारीवरून इम्तियाज अहमद इक्बाल अहमद (रा. नयापुरा), अब्दुल मलीक मोहंमद यासीन (गोल्डननगर), खालीद सिकंदर इक्बाल अहमद (नयापुरा) व मोहंमद अमीन मोहंमद फारूक (जाफरनगर) या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या चौघांच्या नेतृत्वाखाली अजीज कल्लू स्टेडियमवर कोविड व्यवस्थापन आदेशाची अवहेलना करून हजारो महिलांची गर्दी जमविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

ऊर्दू घराला मुस्कान खानचे नाव : महापौर

कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला न घाबरता मुस्कान खान या तरुणीने अल्ला हू अकबरचा नारा देत त्यांना विरोध दर्शविला. येथील ऊर्दू घराला मुस्कान खान हिचे नाव देणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले. कर्नाटकातील भाजप सरकार हिजाबसंदर्भात राजकारण करीत आहे. हिजाबचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयावर विश्‍वास आहे. माजी आमदार आसीफ शेख यांच्या प्रयत्नातून शहरासाठी ऊर्दू घर उभारले आहे. अनेक मुलांसमोर न घाबरलेली शौर्या मुस्कान खान हिचे नाव देण्याचा ठराव महासभेत केला जाणार असून, सर्व सदस्यांनी नामकरणाला समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in