Rohini Khadse With Farmers
Rohini Khadse With FarmersSarkarnama

सांगा, नुकसान सोसायचं तरी कसं..?

धामोडी (ता. रावेर) परिसरात नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा रोहिणी खडसे यांनी समजून घेतल्या.

रावेर : मागील वर्षी जून महिन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने आमच्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वर्षी सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये आमच्या केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. आता आम्ही कुणाकडे पाहायचं, लागलेला खर्च कोण करणार? आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्या, अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या (Jalgaon) माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्याकडे मांडल्या. Rain affecetd farmers asks leaders for helpout package)

Rohini Khadse With Farmers
गिरीश महाजन यांचे नगरसेवकावंरील नियंत्रण सुटले!

रावेर तालक्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने अठरा गावातील ५०४ शेतकऱ्यांचे ३४५ हेक्टरवरील केळी पिकांचे सुमारे १४ कोटी रुपयांचे नुकसान वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. यात वाघाडी, धामोडी, शिंगाडी, कांडवेल, सुलवाडी, ऐनपूर, कोळदा या भागात रोहिणी खडसे यांनी भेटी दिल्या. नुकसानग्रस्त भागात अजूनही विजेचे खांब पडलेले आहेत. तसेच तारा तुटून पडल्या आहेत.

Rohini Khadse With Farmers
राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला देशात मोठा फटका!

त्यामुळे शेतकऱ्यांनी रोहिणी खडसे यांच्याकडे व्यथा मांडताच त्यांनी वीज अभियंत्यांशी फोनवरून चर्चा करून या परिसरातील विजेचे खांब बसवून वीज पूर्ववत करण्याची विनंती केली. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलून तत्काळ पंचनामे व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या. तसेच एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्याशी बोलून लवकरात लवकर मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले.

या वेळी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, प्रमोद रोझोदकर, वाय. डी. पाटील (ऐनपूर), सरपंच अमोल पाटील, भगवान महाजन, कैलास महाजन, पवन महाजन (निंभोरा), सरपंच सचिन महाले, रविराज महाजन, धामोडी येथील शेतकरी नारायण पाटील, विष्णू पाटील, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

--------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in