Devendra Fadanvis News: फडणवीसांनी भाजप आमदार अतुल भातखळकरांचे कान टोचले

छगन भुजबळ यांचा फोटो मॅार्फ केल्याने आमदार भातखळकरांवर कारवाईसाठी जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
Jayant Patil ( Dy. CM Devendra Fadanvis
Jayant Patil ( Dy. CM Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित केला. यातून त्यांनी भुजबळांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. याबाबत कारवाईचा आग्रह धरण्यात आला. (BJP MLA Atul Bhatkhalkar upload morph photograph of Chhagan Bhujbal on social media)

Jayant Patil ( Dy. CM Devendra Fadanvis
Eknath Shinde; `नाफेड`मार्फत अतिरिक्त २ लाख टन कांदा खरेदी करावा

सभागृहातील सदस्यच दुसऱ्या ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil ( Dy. CM Devendra Fadanvis
Grampanchayat News; राष्ट्रवादी काँग्रेसच नंबर वन!

छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या विषयावर स्वतः फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत घडलेल्या प्रकाराविषयी असहमती दर्शविल्याने सभागृहात या उत्तरावर सदस्यांत विशेष चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com