चंद्रकांतदादा उत्तम भविष्यकार ; एकनाथ खडसेंनी उडवली खिल्ली

चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे.
Chandrakant Patil,Eknath Khadse
Chandrakant Patil,Eknath Khadsesarkarnama

जळगाव : ''पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सत्तेवरून जावे लागेल,''असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी दिला. त्यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीतील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत," खडसे माध्यमांशी बोलत होते.

खडसे म्हणाले, ''सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही. बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवानं सरकार पडलंच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार,''

''मध्यप्रदेशात मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपला निवडून दिलं. तर दारूही गरिबांच्या हिताची असल्यानं पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असं वक्तव्य तेथील प्रदेश अध्यक्षांनी केलं आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवाल खडसे यांनी वाईन विक्री धोरणाबाबत केला

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील, असेही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil,Eknath Khadse
Hijab Row:हिजाब वादानंतर शाळाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

''राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत,''असे विधान चंद्रकांत पाटलांनी शनिवारी केले होते. त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की 'चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार,'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com