Eknath Khadse News: एकनाथ खडसेंच्या पत्नीना अखेर दिलासा; भोसरी घोटाळा प्रकरणी अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर

Bhosari Plot Scam : मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
Eknath Khadse, Mandakini Khadse
Eknath Khadse, Mandakini KhadseSarkarnama

Mandakini Khadse Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून 1 लाखाच्या जातमुचलक्यावर मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भोसरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचं नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अटकेची टांगती तलवार खडसे यांच्यावर होती.

Eknath Khadse, Mandakini Khadse
Shahaji Bapu Patil : शहाजीबापूंविरोधात सांगोल्यात सरपंच आक्रमक; नक्की चाललयं काय?

मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. या आधी मुंबई उच्च न्यायालयानं देखील या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला होता.

Eknath Khadse, Mandakini Khadse
Aaditya Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यात दिवसाचा खर्च दहा कोटी; आदित्य ठाकरेंचा आरोप

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सत्र न्यायालयानं अटक वॉरंट काढलं होतं. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलं होतं. त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांचाही जामीन मंजूर करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

देवेंद फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप झाला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप होता.यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील देण्यात आला होता. याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com