जळगाव जिल्हा बँकेत राजकीय वैर विसरून खडसे, महाजन एकत्र!

या निवडणुकीसाठी पॅनेलमध्ये एक दोन जागांचा तिढा लवकरच सोडविण्यात येईल.
Gulabrao Patil, Eknath Khadse, Girish Mahajan
Gulabrao Patil, Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजप नेते गिरीश महाजन हे दोन्ही नेते राजकीय वैर विसरून पॅनेल निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षासह सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठी पॅनेलमध्ये एक दोन जागांचा तिढा लवकरच सोडविण्यात येईल असेही सांगण्यात आले. जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय कोअर कमिटी तयार करण्यात आली होती. या कमिटीची बैठक येथील अजिंठा शासकीय विश्रागृहात झाली. यावेळी हा निर्णय झाला.

Gulabrao Patil, Eknath Khadse, Girish Mahajan
पुरावे द्या, अन्यथा आरोप मागे घ्या : निलम गोऱ्हेंचे चित्रा वाघ यांना आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपचे नेते गिरीश महाजन, आमदार किशोर सुरेश भोळे, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, अॅड. संदीप पाटील उपस्थित होते.

जिल्हा बँक निवडणुकीत संचालकांच्या २१ जागा आहेत. त्या सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपाने महिला राखीव मतदार संघात एक, आदिवासी राखीव, रावेर, जामनेर, जळगाव तालुका, चाळीसगाव, भुसावळ व यावल या आठ जागांची मागणी केली आहे. कॉँग्रेस पक्षातर्फे रावेर व चाळीसगाव या दोन जागांची मागणी केल्याचे समजते. रावेर व चाळीसगाव या दोन सोसायटी मतदार संघाच्या जागांसाठी राष्टवादी कॉँग्रेस देखील ठाम आहे.

Gulabrao Patil, Eknath Khadse, Girish Mahajan
पुण्यात रेल्वे इंजिनाला हवीय कमळाची साथ !

जिल्हा बँकेत सव्वा वर्षे कालावधीसाठी चेअरमन व व्हा चेअरमन पदाचा फार्मुला ठरला. यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे. राष्टवादी कॉग्रेस चौदा जागांवर चर्चा करीत असली तरी कॉँग्रेसला एक जागा देण्याची मनस्थिती नेत्यांची असल्याचे समजते. रावेर विकास सोसायटीची जागा कॉँग्रेसला सोडली जाऊ शकते. परंतू भाजपाने संचालक नंदू महाजन यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची केली असल्याने कॉँग्रेसला ती मिळणे मुष्कील होणार आहे. आजच्या कोअर कमिटीच्या बैठकित चाळीसगाव, रावेर, यावल, आदिवासी राखीव व महिला राखीव या जागांबाबत मात्र चर्चेत एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. याबाबत पुन्हा चर्चा होणार असून निवडणूक जाहीर होण्याआधी सर्वपक्षीय उमेदवार निश्चीत होणार आहेत.

याबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात बँकेत सर्व पक्षांनी एकजुटीने काम केल्याने बँक चागल्या स्थितीत आली आहे. यावेळी सर्व पक्षाचे पॅनल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एक, दोन जागांचा वाद आहे त्यावर तोडगा निघेल.

आमदार गिरीश महाजन म्हणाले, आज बैठकीत चांगली चर्चा झाली. एक दोन जागेवर वाद आहेत ते सोडविले जातील. एकनाथ खडसे पॅनलमध्ये असल्यास भाजप असणार नाही, असे आम्ही कधीही म्हटले नाही. सहकारात पक्ष नको हीच आमची भूमिका कायम आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, एक दोन जागेचा वाद पुढच्या बैठकीत सोडविला जाईल. सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com