Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Devidas Pingle & Shivaji ChumbhaleSarkarnama

Nashik APMC News: बारा संचालकांना घेऊन देविदास पिंगळे गेले अज्ञातस्थळी!

Nashik Bazar Samiti: सभापतींचा निवडणूक कार्यक्रम लांबविण्यासाठी सहकार विभागावर दबाव असल्याची चर्चा.

Devidas Pingle News: बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास पिंगळे यांनी १२ जागा जिंकत शिवसेनेच्या शिवाजी चुंभळे यांचा दणदणीत पराभव केला. मात्र अद्यापही पिंगळे विरोधकांनी आशा सोडलेली नाही. सभापतीची निवडणूक लांबविण्यासाठी दबाव असल्याने अस्वस्थता आहे. त्यामुळे श्री. पिंगळे आपल्या बारा संचालकांसह अज्ञातस्थळी निघून गेले आहेत. (Rumors of high level pressure to delay chairman election)

बाजार समितीची निवडणूक (APMC election) शिवसेनेच्या (Shivsena) शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विद्यमान सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्यासाठी मोठे आव्हान होते. निकाल लागला, तरीही अद्यापही विरोधकांनी आशा सोडलेली नाही, असे बोलले जाते. त्यामुळे सत्ताधारी गटला दगाफटका होण्याची भिती आहे.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Chhagan Bhujbal news : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष का नाही ठेवले?.

या निवडणुकीत पिंगळे गटाला बारा तर विरोधकांना सहा जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपच्या एका नेत्यांने हस्तक्षेप करीत व्यापारी व हमाल-मापारी गटातील तीन बिनविरोध निवडून आलेल्या पिंगळे गटाच्या संचालकांना वेगळ्या गटात ढकलण्याचा प्रयत्न केला होता. तसे झाल्यास समसमान बलाबल होऊन अस्थिरता निर्माण होण्याची भिती आहे.

असे होत असतानाच धुळे व जळगावमध्ये काही समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडणुका झाल्याचे वृत्त आहे. असे असताना नाशिक जिल्ह्यात मात्र अद्याप एकाही समितीची निवडणूक झालेली नाही. त्या केव्हा होणार याबाबत देखील अनिश्चितता आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी आधीच सजग असलेल्या पिंगळे गटाने देखील राजकीय डावपेच आखले आहेत. आपल्या बारा सदस्यांसह ते काल सायंकाळी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Owaisi News : `लव्ह जिहाद` विषयी बोलता, बेपत्ता महिला संदर्भात गप्प का?

उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक तत्काळ घ्यावी. यासाठी पिंगळे गटाच्या निवडून आलेल्या सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना पत्र दिले आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली नाशिक बाजार समितीचे २८ एप्रिलला मतदान झाले. २९ एप्रिलला मतमोजणी झाली. निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्याप सभापती, उपसभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

पिंगळे गटाचे वर्चस्व असले तरी विरोधी पॅनल काही चमत्कार करतो का, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. सभापती निवड प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आपलं पॅनलच्या बारा सदस्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणुकीसाठी पत्र दिले आहे. यात राजपत्रातील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री ( विकास व विनिमय) अधिनियम १९६३ प्रमाणे कमल १९ अन्वये नाशिक बाजार समितीत निवडून आलेल्या सदस्यांची निवड प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे नमूद करण्यात आले आहे.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
APMC yeola news : येवल्याच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा!

देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, विनायक माळेकर, सविता तुंगार, जगन्नाथ कटाळे, भास्कर गावित, निर्मला कड, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम यांनी सहीनिशी पत्र देत मागणी केली आहे.

---

निवडणूक निकाल लागल्यानंतर ३० दिवसांत सभापती व उपसभापती यांची निवड होणे बंधनकारक आहे. नाशिक बाजार समितीसाठी पत्र आलेले असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे.

- सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com