Budget News; ...हे तर निव्वळ फसवे बजेट!

माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात गांभिर्याने राज्याच्या गरजांचा विचार केलेला नाही.
Samir Bhujbal
Samir BhujbalSarkarnama

नाशिक : (Nashik) आगामी निवडणुका (Elections) डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणांचा (Proclamation) अवकाळी पाऊस पाडण्याचा प्रयत्न राज्याच्या (Maharashtra) अर्थमंत्र्यांनी (FM) केला असून हे निव्वळ फसवे बजेट (Budget) असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे. (State Government present a budget of political Proclamation)

Samir Bhujbal
Dilip Bankar News: कांदा आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार भुजबळ यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, राज्यापुढे अनेक गंभीर समस्या, नागरिकांच्या अडचणी व शेतकरी समस्या आहेत. त्यावर समाजघटक अस्वस्थ आहेत. त्याला या अर्थसंकल्पात कुठेही स्पर्श झालेला नाही. त्यामुळे हे असंवेदनशील सरकार वाटते.

Samir Bhujbal
Nashik News: विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जनतेचा कौल लक्षात घेऊन त्याचं मन जिकण्यासाठी निव्वळ घोषणा करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट दिसते आहे.

नाशिकसाठी अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी निधी देऊ अशी घोषणा केली. मात्र त्यासाठी कुठलीही तरतूद दिसत नाही. नाशिकला मेट्रोची गरज असतांना नाशिक निओ मेट्रोवर नाशिकची बोळवण केली आणि याही प्रकल्पासाठी निव्वळ घोषणा केली. त्यासाठी किती निधी देणार यात स्पष्टता नाही.

Samir Bhujbal
BJP News; यंदाचा अर्थसंकल्प जनभागीदारीतील विकासाचा आराखडा

एकंदरीत काय तर नाशिककरांच्या तोडला पाने पुसले असून या अर्थसंकल्पातून तर नाशिककरांच्या वाटेला नेमकं काय आलं हा तर संशोधनाचा विषय ठरेल अशी टीका समीर भुजबळ यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in