Nashik Graduate election; शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आज भुजबळ मैदानात!

महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक
Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Chhagan Bhujbal & Shubhangi PatilSarkarnama

नाशिक : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाशिक (Nashik) पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी (NCP) भवन येथे बैठक होणार आहे. शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीचे घटक पक्ष या निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. (Chhagan Bhujbal will take campaign meeting for Shubhangi Patil)

Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Vikhe-Patil News; नाना पटोलेंनी स्वतःचे नाक सांभाळावे

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नुकताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी भुजबळ मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते.

Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Pune : "त्यांचे अन् माझे विचार एकच, आता त्यांना भेटून ओळख वाढवेन"

या मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेष आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपशी संबंधीत कार्यकर्ते, मतदारांत निवडणुकीबाबात गोंधळाचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिवसेनेने याबाबत थेट मतदारांशी संपर्क तसेच दुरध्वनीद्वारे मतदारांशी संपर्क करून मतदानाबाबत पाठपुरावा केला आहे. त्यासाठी त्यांची मुंबईचे विविध नेते पक्षाच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष किती सक्रीय होतो, याची उत्सुकता आहे.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी भवन येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व पदवीधरांनी व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in