Nashik News; महाविकास आघाडीचा गुलाल उधळण्यासाठी परिश्रम घ्या!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवार शुभांगी पाटील यांना दिल्या प्रचाराच्या टिप्स
Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Chhagan Bhujbal & Shubhangi PatilSarkarnama

नाशिक : (Nashik) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या पदवीधर मतदार संघातील पहिल्या उमेदवार असल्याने त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. यावेळी भुजबळ यांनी उमेदवार पाटील यांना आपल्या कामाचे कोण?, कोणाला भेटायचे?, प्रचार कसा व कुठे कुठे करायचा याच्या बारीक सारीक टिप्स दिल्या. (Nashik Graduate constituency election campaign at high time)

Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, दत्ता गायकवाड, प्रेरणा बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Chhagan Bhujbal & Shubhangi Patil
Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी घटक पक्षासह विविध शिक्षण संस्था व त्यांचे पदाधिकारी काम करीत आहेत. यासंदर्भात मोठ्या संख्येने मतदार असलेल्या शिक्षण संस्था, वकील संघ, शासकीय कार्यालये, शिक्षण क्षेत्रातील कार्यरत लोकांच्या संघटना आदी मतदारांशी संपर्क केला जात आहे. निवडणूक दोन दिवसांवर आल्याने मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शिवसेना उपनेते सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, विलास शिंदे, विष्णुपंत म्हैसधूने, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com