Anil Gote News : 'माल लगाव अन्‌ माल कमाव' हाच त्यांचा धंदा; अनिल गोटे शिंदे फडणवीस सरकारवर बरसले

Maharashtra Politics : '' मोदी राहुल गांधींना पप्पू म्हणतात. मात्र, ते स्वतः च पप्पू आहेत...''
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama

Nandurbar Political News : राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीवरुन शिंदे फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे. राज्यकर्ते हे नीच, नालायक, हलकट आणि स्वार्थी आहेत. त्यांचा माल लगाव आणि माल कमाव हाच फक्त धंदा आहे असा हल्लाबोल गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटे(Anil Gote) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गोटे म्हणाले, राज्यकर्ते हे केवळ बोलतात. मात्र त्यांना शेतकऱ्यांची अजिबात जाण नाही. शेतकऱ्यांना एक दमडीची मदत न देणारे हे हलकट राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील असे वाटत नाही असेही गोटे म्हणाले.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Sanjay Shirsat News : चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवू नका..

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद आणि त्यांच्या विदेशातील भाषणामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याने सूडामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोपही गोटे यांनी केला. मोदी त्यांना पप्पू म्हणतात. मात्र, स्वतः मोदी पप्पू आहेत असा टोलाही गोटेंनी मोदींना लगावला आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Eknath Shinde News : ठरलं ! मुख्यमंत्री शिंदेंची 'धनुष्यबाण यात्रा' निघणार; 'या' शहरातून सुरूवात..

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनाहीन...

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनाहीन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले. मात्र सरकारमधील मंत्री अधिवेशनाचे नाव करून अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल, अशा घोषणा राज्यभर करत फिरले. अधिवेशन संपले मात्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही. पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचं चित्र आहे. सरकार फक्त आणि फक्त आश्वासनापलीकडे काही करत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant patil) यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com