BJP News; `राष्ट्रवादी`च्या अमृता पवार, शिवसेनेच्या तनुजा घोलप यांचा भाजप प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीला जोर का झटका!
Devendra Fadanvis with Amruta Fadanvis & Tanuja Bhoir
Devendra Fadanvis with Amruta Fadanvis & Tanuja Bhoir Sarkarnama

मुंबई :(Mumbai) शिवसेनेचे (Shivsena) उपनेते बबन घोलप (Baban Gholap) यांची कन्या तनुजा भोईर (Tanuja Bhoir) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या, माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. यानिमित्ताने नाशिकच्या राजकारणात भाजपने एकाचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोर का झटका दिला आहे. (NCP leader Amruta Pawar joins BJP Today in presence of Devendra Fadanvis)

Devendra Fadanvis with Amruta Fadanvis & Tanuja Bhoir
Amruta Pawar News: `राष्ट्रवादी`ला धक्का...मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश?

आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई येथे श्री. फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांसह विविध नेते उपस्थित होते. नाशिकच्या राजकारणासाठी हा प्रवेश कार्यक्रम भविष्यात काय राजकीय बदल घडवतो याबाबत उत्सुकता आहे.

Devendra Fadanvis with Amruta Fadanvis & Tanuja Bhoir
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ काळ एकनीष्ठ असलेल्या पवार कुटूबातील अमृता पवार यांचा भाजप प्रवेश अनेकांना धक्कादायक ठरला आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला कंटाळून हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य पवार यांनी समर्थकांच्या आग्रहातून हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. आर्कीटेक्ट अमृता पवार या देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या होत्या. त्यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक दहा हजारांचे मताधिक्य मिळवल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

Devendra Fadanvis with Amruta Fadanvis & Tanuja Bhoir
Gopichand Padalkar News; मेंढपाळांसाठी ठोस तरतुद असलेला पहिला अर्थसंकल्प

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय व विश्वासातले, शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप-भोईर यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे वडील ठाकरेंकडे तर कन्या भाजपमध्ये असे चित्र निर्माण झाले. यामुळे देवळाली मतदारसंघ तसेच नाशिक शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आता शिवसेना नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप गेली काही वर्षे सातत्याने एकनाथ शिंदे गट तसेच भाजपात प्रवेशाची चाचपणी करीत होत्या. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com