NCP News; अंबादास खैरे यांनी पाच एकर कोबीवर फिरविला नांगर

शेतमालाला भाव मिळत नसल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांना पुन्हा संपावर जाण्याची वेळ आली आहे.
Ambadas Khaire
Ambadas KhaireSarkarnama

नाशिक : (Nashik) शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी (Farmers) अडचणीत आहेl. त्याची झळ सगळ्यांनाच बसते आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी आपल्या पाच एकर कोबी पीकावर आज ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केले. (NCP`s Ambadas Khaire turning a plough in Gabbage Farm)

Ambadas Khaire
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

श्री. खैरे यांच्या पाडळी देशमुख (इगतपुरी ) येथील शेतात पिकविलेल्या कोबीला केवळ १ रुपया नग भाव मिळत होता. त्यात पीक काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने त्यांनी आपल्या ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला होता. पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा अडीच लाख रुपये खर्च झाला. मात्र सध्या भाजीपाल्याला काहीच भाव नाही. त्याची झळ सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. अनेकांनी याबाबत पीके नष्ट करण्याचा पर्याय स्विकारला आहे.

Ambadas Khaire
BJP News; भाजप म्हणते महापालिका प्रशासक ‘जबाब दो’

कोबी पिकाला सध्या केवळ १ रुपये प्रती नग भाव मिळत असल्याने त्यांनी आज शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. निराश होऊ नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा खैरे यांनी दिला.

Ambadas Khaire
Nashik News; सुहास कांदेंच्या मतदारसंघात पाच माजी आमदारांनी फुंकले रणशिंग!

ते म्हणाले, मी एक सुज्ञ शेतकरी असून आपण कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने या शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com