
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अनेक वेळा सभेत बोलताना खुमासदार टोलेबाजी करतात. त्यामुळे त्यांच्या सभेतील नागरिकही त्यांना चांगलीच दाद देताना अनेक वेळा पाहायला मिळालं. असाच एक प्रसंग आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला.
कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन, काद्यांचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी अनुदान अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.
याचवेळी ते बोलत असताना कार्यक्रमामध्ये बसलेल्या एका व्यक्तीने दुष्काळी अनुदानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर अजित पवारांनी आपल्या खास खुमासदार शैलीत दिल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
नेमकं घडलं काय?
''अजितदादा..या सरकारने अजून दुष्काळी अनुदान दिलं नाही'', असा प्रश्न सभेत बसलेल्या एका व्यक्तीने अजित पवारांना विचारला. त्यावर पवार म्हणाले, ''आरे ते तर सांगत आहेत दिलं होतं. पण आता उद्या मी देखील हेच त्यांना विचारणार आहे'', असं पवार म्हणाले.
या उत्तरावरही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचे समाधान झाले नाही. या व्यक्तीने पुन्हा विचारले की,''तुमच्या काळात अनुदान मिळत होतं. पण या सरकारने अजून अनुदान दिलं नाही''.
यानंतर मात्र, अजित पवारांनी प्रश्न वितारणाऱ्या व्यक्तीला आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले,''तू आमदार निवडून दिला असता तर कशाला खोके सरकार निवडून आलं असतं. शेवटी परत तुझ्यावरच येतंय बघ..'', असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
''आमचं काम मी टाळत नाही. नाकारत देखील नाही. जी जबबादारी आम्ही स्वीकारली ती आम्ही तडीस नेतो. पण हे करत असताना आम्हाला तुमची साथ असायला हवी'', असं म्हणत त्यांनी नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.