रोहिणी खडसेंवरील हल्ला; आक्रमक राष्ट्रवादीचा २४ तासांचा अल्टीमेटम!

खडसे यांच्यावरील हल्ल्यानंतर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
NCP District President Ravindra Patil

NCP District President Ravindra Patil

Sarkarnama

जळगाव : राषष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वाहनावर राजकीय वादातून हल्ला करण्यात आला होता. त्यातून त्या बचावल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांच्यातील शाब्दीक राजकीय वादानंतर हे प्रकरण घडले. यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी केली.

<div class="paragraphs"><p>NCP District President Ravindra Patil</p></div>
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा इशारा, `आप`च्या भावेंना काळे फासू!

हल्ला करणार्‍यांना अटक करण्याच्या कारवाईची जोरदार मागणी करीत आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी जळगावात पोलीस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सौ. रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे त्यातून पहायला मिळाले.

<div class="paragraphs"><p>NCP District President Ravindra Patil</p></div>
धुळे महापालिकेत दोन कोटींचा कोरोना लस घोटाळा?

मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली खडसे यांच्या निवासस्थानापासून पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पोलिस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. संशयितांना तत्काळ अटक करावी तसेच याबाबत कठोर कारवाईसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. घोषणांनी मुक्ताईनगर पोलीस ठाणे परिसर दणाणला होता. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com