नाथाभाऊ, शूटर लावून मला मारून टाका : चंद्रकांत पाटील

त्या दोन्ही क्लिप व्हायरल कराव्या खरे खोटे जनतेला ठरवू द्यावे,'' असे आव्हान शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहे
Eknath Khadse, Chandrakant Patil
Eknath Khadse, Chandrakant Patil sarkarnama

जळगाव : ''माझ्या सारखा सर्वसामान्य माणूस आमदार झाल्यामुळे पोटशूळ उठत असेल तर खडसे यांनी माझ्या मागे शूटर लावून मला मारून टाकावे, त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका न करता त्या दोन्ही क्लिप व्हायरल कराव्या खरे खोटे जनतेला ठरवू द्यावे,'' असे आव्हान शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहे.बोदवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''आज राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक बोदवड शहरात आयोजित केली गेली होती त्या बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझ्यावर जे गलिच्छ असे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत, असे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले दोन दिवसआधी ईडी ची नोटीस मिळत होती म्हणून खडसे फरार होते ते कुठून प्रकटले त्या दोघेही क्लिप त्यांनी व्हायरल कराव्या आणि दूध चे दूध पाणीचे पाणी होऊ द्यावे.''

Eknath Khadse, Chandrakant Patil
ठाकरेंच्या गळाला लागला नवा मासा

'''माझ्याकडे मुस्लिम समाजाचे सईद भाई व गोपाळ कोळी हे दोघे ही ड्रायव्हर असून यांचा त्या प्रकरणाशी कोणताच संबंध नाही. माझ्याकडे येणारा एखादा कार्यकर्ता असू शकतो त्याचा संबंध माझ्याशी जोडता येत नाही. महिला सुरक्षा बाबत माजी आमदार एकनाथ खडसे एवढे जागृत कसे त्यांनी अंजली दमानिया (Anjali Damania) बाबत आपली सून व मुलगी सभेत उपस्थित असतांना दमानिया बाबत आक्षेपार्ह घाणेरडे विधान केले होते, त्याचा त्यांच्या वर गुन्हा दाखल आहे, सख्या भाचा महिलेच्या हत्येप्रकरणी अटकेत असून त्याच्यावर खडसे साहेब शब्दही बोलत नाही,राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशा वेळी पवार साहेब उपस्थित असतांना बाया माझ्या मागे लावल्या, असे विधान खडसे यांनी केले होते.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मी सामान्य कुटुंबातील असून माझा ध्यास मतदार संघचा विकास करणे आहे. त्यामुळे माझ्या विकासात्मक भूमिकेवर विश्वास ठेवून माझ्याकडे नगरसेवकांचा प्रवेश झाला याचा पोटशूळ त्यांच्या मध्ये असल्याचे दिसत आहे. माझ्या गरजा कमी आहे मी आजवर एकनाथ खडसे ,रोहिणी ताई, रक्षा ताई यांचा आदरच केला आहे. त्यांच्या बाबत वैयक्तिक असे कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही.''

आमदार पाटील म्हणाले की खडसे साहेब आणि मी दोघे ही सत्ताधारी पक्षाचे सदस्य असून झोटिंग समितीचा अहवाल खुला करावा असा आग्रह नाथाभाऊंचा सुद्धा होता आणि मी सुध्दा माझ्या लेटर पॅड वर खुला करण्यासंबधी विनंती करणार ज्यामुळे खडसे साहेबांना क्लीनचित मिळेल आणि जर माझ्या सारख्या सर्व सामान्य माणूस आमदार झाल्यामुळे पोटशूळ उठत असेल तर खडसेंनी माझ्या मागे शूटर लावून मला मारून टाकावे कारण ते मोठे आहे माझ्या विनंती आहे. त्यांना त्यांनी दोघे ही क्लिप जनतेत व्हायरल कराव्या आणि जनतेला खरे खोटे ठरवू द्यावे व माझ्यावर वैयक्तिक खालच्या पातळीची टीका करणे बंद करावे ते ज्येष्ठ आहे. त्यांनी त्यांचा मानसन्मान राखावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, नगराध्यक्ष पती सईद बागवान, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक सलीम कुरेशी,आनंदा पाटील, इरफान शेख, संजय गायकवाड, तालुका प्रमुख गजानन खोडके, दीपक माळी, हर्षल बडगुजर, अमोल व्यवहारे, शांताराम कोळी, कलिम शेख, मनोज पाटील, परेष अग्रवाल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com