NCP News: मालेगाव नको, बागलाणला प्रशासकीय कार्यालये करावी!

माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे मालेगाव जिल्हा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर मागणी केली.
Deepika Chavan
Deepika ChavanSarkarnama

सटाणा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मालेगाव (Malegaon) दौऱ्‍यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मालेगाव जिल्ह्याची घोषणा केली. तर भौगोलिक स्थिती, आदिवासी (Trible) व सामान्य जनतेचा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर प्रशासकीय कार्यालयांची स्थापना बागलाण तालुक्यात करावी, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Dee pika Chavan Deemands that All Government Offices & Establishments shall be in Satana)

Deepika Chavan
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

याबाबत श्रीमती चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण प्रथमच नाशिक जिल्ह्यात येत असल्याने बागलाण तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आहे. मालेगाव येथे आढावा बैठक घेणार असल्यामुळे मालेगाव जिल्हा निर्मितीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मालेगाव जिल्हा झाल्यास नैसर्गिक न्याय तत्वानुसार बागलाण तालुक्‍याचा समावेश मालेगाव जिल्ह्यात होणार आहे. परंतु, मालेगाव जिल्हा होणार असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्व प्रशासकीय कार्यालये ही मालेगाव शहरात न ठेवता ती बागलाण तालुक्यात असावी, अशी बागलाणच्या जनतेची आग्रही मागणी आहे.

Deepika Chavan
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे `मालेगाव`च्या ट्रॅपमध्ये अडकणार!

बागलाण तालुका हा आदिवासीबहुल असून, तालुक्‍याचा भौगोलिक अभ्यास केला असता तालुक्‍यातील आदिवासी पश्‍चिम पट्ट्यातील व गुजरात सीमेवरील आदिवासी जनतेला तसेच त्याचबरोबर कळवण व देवळा या दोन्ही तालुक्‍यातील जनतेला सुद्धा प्रशासकीय कामांसाठी १०० किलोमीटर अंतरावरील प्रस्तावित मालेगाव जिल्हा ठिकाणी जाणे अवघड आणि गैरसोयीचे होणार आहे.

तंत्र, मंत्र आणि यंत्रभुमी म्हणून नाशिकचा देशभरात लौकिक आहे. तर एक अशांत शहर म्हणून मालेगावचा महाराष्ट्रात लौकिक आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न कधीही निर्माण होवू शकतो. मालेगावमध्ये हिंदू- मुस्लिम समाजामध्ये तेढ वाढविण्याचे कामही काही धर्मांध शक्‍ती कायम करीत असतात. त्यामुळे मालेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरीकांमध्ये नेहमीच असुरक्षिततेची भावना असते. मालेगावला जोडणारे रस्तेही अत्यंत खराब असून, कोणत्याही आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे अशा अनेकविध कारणांमुळे मालेगाव जिल्ह्यात आमचा समावेश करू नये, अशी आजुबाजूच्या तालुक्‍यातील जनतेची कायम मागणी राहिली आहे, असे श्रीमती चव्हाण यांनी नमूद केले आहे.

राज्यात रायगड जिल्ह्याचे मख्यालय अलिबाग येथे तर तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरस येथे आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार करून रायगड व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मुख्यालये जिल्ह्याच्या इतर ठिकाणी आहेत. त्या पद्धतीनेच मालेगाव जिल्हा निर्मिती झाल्यास बागलाण, कळवण व देवळा तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करता बागलाण तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्व प्रशासकीय कार्यालये सुरु करावीत, असे दीपिका चव्हाण म्हणाल्या.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in