Security: छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करा!

नाशिकच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लिहिले गृहमंत्र्यांना पत्र
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front) नेत्यांच्या सुरक्षेत कपात (Reduction of security) केली. त्याचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP)गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. (Nashik NCP Youth wing wrote a letter to Devendra Fadanvis for Chhagan Bhujbal security)

Chhagan Bhujbal
ठाकरेंनी स्वीकारले सत्तारांचे चॅलेंज; 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये तोफ धडाडणार...

समाजात नावलौकिक असलेल्या तसेच प्रतिष्ठीत व्यक्तीची सुरक्षा राज्य सरकारकडून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अती महत्वाची राजकीय व्यक्ती आहे. त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Chhagan Bhujbal
मुख्यमंत्री शिवारात रमतात...अन् स्वत: कोळपणी करतात तेव्हा...

महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली. इतर काही व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. श्री. भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्वाचे नेते आहे. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहे.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. बहुजन समाजाच्या न्याय्य हाक्कासाठी ते नेहमी लढा देत असतात. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांचा देशभर वावर असतो. २००२ ते २००३ या कालावधीत ते राज्याचे गृहमंत्री असताना विविध गुन्हेगारी गँगच्या हस्तकांना अटक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. ओबीसी आरक्षण, मनुस्मृती जाळणे यासारख्या जिवंत प्रश्नांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. श्री. छगन भुजबळ हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील काम करतात याठिकाणी सुद्धा त्यांना धोका असतो.

विविध सनातनी संघटनांकडून श्री.भुजबळ यांना मारण्याच्या धमक्या वेळोवेळी मिळत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते श्री. भुजबळ यांच्या विरोधात नेहमी आंदोलने करतात. विविध सनातनी प्रवृतींपासून त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा पूर्ववत करण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in