
नाशिक : चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणे, हे अयोग्य असून केंद्र सरकार (Centre) सैन्य दलात कंत्राटी भरती सुरू करत आहे. यातून सैन्यात (Army) देखील कंत्राटी पद्धती आणली जात आहे. हे युवकांसाठी निराशाजनक असून सरकार रोजगार देऊ शकत नाही, असा हा संदेश आहे. या सरकारने ताबडतोब योजना मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी केली. (NCP agitaion against centre`s Agneepath scheme)
अग्निपथ योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येथील शहीद चौकात शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले. निदर्शनानंतर मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले. (Nashik Latest Marathi News)
सैन्यात भरती झालेल्या तरुणांना दोन वर्षासाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र, सदर योजनेतंर्गत प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून सहा महिने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा कसा असणार हे या निर्णयातून लक्षात येते. अग्निपथ योजनेत भाग घेणाऱ्या १०० टक्के तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यातील २५ टक्के तरुणांची सैन्यात कायम भरती करून उर्वरित ७५ टक्के तरुणांना ४ वर्षात प्रमाणपत्र देऊन निवृत्त केले जाईल.
या निर्णयामुळे देशात बेरोजगारांची संख्या आणखी वाढणार असून हाताला काम नसल्याने प्रशिक्षण घेतलेले तरुण देशविरोधी कारवाई अथवा इतर चुकीच्या मार्गाला लागतील. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा योजनेला विरोध असून सैन्यभरती पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, किशोर शिरसाट, शदाब सय्यद, योगिता पाटील, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, जय कोतवाल, गणेश पवार, सागर बेदरकर, डॉ.संदीप चव्हाण, सुनील घुगे आदी उपस्थित होते.
.....
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.