महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करणार!

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली.
Chhagan Bhujbal with Nashik NCP Office bearers
Chhagan Bhujbal with Nashik NCP Office bearersSarkarnama

नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत (NMC) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

Chhagan Bhujbal with Nashik NCP Office bearers
ST Strike; आज हेकेखोर संपकरी कर्मचाऱ्यांचे मार्ग बंद होणार?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. त्या निकालाची वाट न पाहता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे. पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी.

Chhagan Bhujbal with Nashik NCP Office bearers
शिवसेनेचा संकल्प, एक लाख महिलांना रोजगार देणार!

ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती आहे. वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दृष्टीने अधिक जोमाने कामाला लागावे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची इच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अॅड. गौरव गोवर्धने, शहर सरचिटणीस संजय खैरणार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जिवन रायते, मकरंद सोमवंशी, प्रांतिक सदस्य महेश भामरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com