NCP News; राष्ट्रवादीच्या सहकार नेत्याचा कार्यकर्त्याकडूनच पराभव जिव्हारी!

दूध संघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचा पराभव
Walmik Patil
Walmik PatilSarkarnama

जळगाव : जिल्हा (Jalgaon) सहकारी दूध संघाच्या (Milk federation) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) सहकार (Cooperative) विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे सहकारी वाल्मीक पाटील यांचा राष्ट्रवादीचेच, पण भाजप- शिंदे गटाकडून (BJP) निवडणूक लढलेले संजय पवार (Sanjay Pawar) यांच्याकडून पराभव झाला. निवडणुकीपूर्वी सर्व मतदारांशी थेट संपर्क साधल्यानंतर वाल्मीक पाटील (Walmik Patil) यांना विजयाची खात्री होती, पण तसे झाले नाही. (NCP cooperative cell president defeated by ncp workers)

Walmik Patil
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या कन्येवर प्राणघातक हल्ला

निकालानंतर मतदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला. परिणामी, अनेक मतदारांनी व सहकार क्षेत्रातील मंडळी व राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी श्री. पाटील यांच्या प्रतिसंवेदना व्यक्त केली. त्यामुळे ‘तेरी जीत से मेरी हारके चर्चे अधिक है’, अशा शब्दात वाल्मीक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Walmik Patil
Sureshdada Jain news; जैन आज जळगावात, भाजप नेते झाले सावध

दूध संघात सर्वपक्षीय पॅनलच्या चर्चा झाल्या, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आमदार खडसे यांच्या नावाचा आग्रह धरल्याने अखेर भाजप-शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी निवडणूक रंगली. धरणगाव तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील व भाजप शिंदे गटाचे पण राष्ट्रवादीचेच उमेदवार संजय पवार यांच्यात लढत झाली. मतदारांशी थेट गाठीभेटी, सहकार क्षेत्राचा अनुभव आणि दांडगा लोकसंग्रह यामुळे श्री. पाटील यांचा विजय आदल्या दिवशीपर्यंत निश्चित मानला गेला होता. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांवर जादूची कांडी फिरवावी तसा पाटील यांचा काही मतांनी पराभव झाला. पारोळ्याचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनाही या जादूच्या कांडीचाच फटका बसला.

त्यांच्या पराभवानंतर शेकडो सहकार कार्यकर्ते व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याप्रति सहानुभूती दर्शविली. परिणामी, ‘तेरी जीत से मेरी हार के चर्चे ज्यादा है’, असाच काहीसा अनुभव वाल्मीक पाटील यांनी घेतला. विजयापेक्षाही पराभवानंतर किती कार्यकर्त्यांमध्ये आपल्याबाबत स्नेहभाव आहे, याची प्रचिती त्यांना आली.

निवडणूक आली म्हणजे जय- पराजय हा सुरूच असतो. त्या गोष्टीचे फार वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, पण जिंकल्यापेक्षाही पराभवानंतर मतदार व सहकार क्षेत्रातील दिग्ग्जांकडून मिळालेली सहानुभूती ही माझ्यासाठी ऊर्जा देणारी लाख मोलाची अशी बाब ठरली. विजय उमेदवारापेक्षा माझ्या पराभवाचे आश्चर्य व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया मला हरल्यानंतरही सुखावून गेल्या. सर्व स्नेही जणांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

-वाल्मीक पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी सहकार विभाग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in