NCP News: नरहरी झिरवळांनी दिंडोरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले

राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिल्याने नरहरी झिरवाळांच्या गोटात आनंद.
NCP supporters celebration
NCP supporters celebrationSarkarnama

लखमापूर : दिंडोरी (Dindori) तालुक्यात ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध (Unopposed) झाल्या. उर्वरित ४५ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्ता मिळवीली. उर्वरित ग्रामपंचायतीवर शिवसेना पाच, (Shivsena) माकप दोन, (CPM) आघाडी पाच, इतर दोन, असे वर्चस्व राहिले. निकालानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला. (NCP supporters celebrate victory on maximum Village Panchayat election)

NCP supporters celebration
Nana Patole: नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तीव्र राजकीय स्पर्धा आहे. विधानसभेचे माजी सभाापती नरहरी झिरवाळ, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी व अन्य विविध सत्तापदांवर पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे वर्चस्व टिकविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सत्ता टिकविणे अत्यंत आवश्यक होते. त्यात सध्या या पक्षाचे नेते यशस्वी झाले.

NCP supporters celebration
पालकमंत्रीपद : कुणाला मिळणार कोणता जिल्हा ?

थेट सरपंच पदासाठी निवडून आलेले उमेदवार असे : अक्राळे- अर्चना डगळे, अंबानेर- छाया रेहरे, आंबेगण- सुरेश वाघ, आंबेवणी- शोभा मातेरे, भातोडे- संगीता महाले, चारोसे- संगीता गायकवाड, दहेगाव- मंगल वाघ, देहरे-मंगला गवळी, देवघर- मंदाबाई जाधव, देवठाण- मनीषा गुंबाडे, देवपाडा- नाजोका चौधरी, देवपूर- कांतिलाल चव्हाण, ढकांबे- मनीषा पोटिंदे, धाऊर- संगीता बोंबले, धोंडाळपाडा- लता गायकवाड, जांबुटके- मंदा लांडे, जानोरी- सुभाष नेहरे, जऊळके दिंडोरी- भारती जोंधळे.

याशिवाय करंजवण- संदीप गांगुर्डे, कसबे वणी- मधुकर भरसट, खतवड- बबन दोबाडे, खेडले- उषाबाई वाघ, कोचरगाव- कल्पना टोंगारे, कृष्णगाव- सुनीता कडाळे, मडकीजांब- रोहिणी मोरे, माळेगाव काजी- रचना गायकवाड, मोहाडी- आशा लहांगे, मोखनळ- रेणुका जोपळे, मुळाणे- ललिता राऊत, नळवाडी- प्रमिला गायकवाड, नळवाडपाडा- हिरामण गावित, निगडोळ- कृष्णा रेहरे.

तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीमध्ये पळसविहीर- फुलाबाई चौधरी, फोफशी- संगीता जाधव, पिंपळणारे- छगन कडाळे, पिंपरखेड- सोनाली मोरे, राजापूर- रामकृष्ण गवारे, रासेगाव- मंदा बेंडकोळी, शिवनई- चंद्रकांत निंबाळकर, शिवारपाडा- जनाबाई चौधरी, तळेगाव दिंडोरी- सोनाली चारोस्कर, तळ्याचापाडा- हर्षाली गांगुर्डे, टिटवे- सूरज राऊत, उमराळे खुर्द- सूरज चारोस्कर, वरवंडी- वंदना धुळे, झार्ली- निवृत्ती सांबळे आदींनी विजय मिळवला. कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com