गद्दार म्हटलं की त्यांचे दाबे दणाणते, गद्दार पुन्हा निवडून येत नाहीत ; अजितदादांनी शिंदे गटाला सुनावलं

Ajit Pawar | "तुम्ही नवीन कामे करा, आमच्या योजनांना स्थगिती देऊ नका,"असे अजित पवार यांनी शिंदे सरकारला सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) नेते, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाच्या निवड रखडली आहे, यावरुनही पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (Ajit Pawar latest news)

अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वेदांता प्रकल्पावरुन त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. "सध्या सरकारच्या सोयीने सगळं सुरु आहे, त्यामुळे आता थेट सरपंचापासून मुख्यमंत्र्यांचीही निवड करा," असा टोला पवारांनी शिंदेंना लगावला.

अजित पवार म्हणाले, "वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प भागीदारीतून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार होती. महाराष्ट्रात पोषक वातावरण असताना हा प्रकल्प हलवला. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदांता समूहाने जाहीर केले आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. तरुणांनी या विरोधात पेटून उठलं पाहिजे,"

Ajit Pawar
NCP : महाराष्ट्र को क्या मिला ? ; लॉलीपॉप लॉलीपॉप.. : पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

"शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरतला जाणाऱ्या आमदारांमध्ये औरंगाबाद, जळगाव येथील आमदार जास्त होते. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटलं की त्यांचे दाबे दणाणते. फुले-शाहुंच्या राज्यात ही गद्दारी चालणार नाही, गद्दारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत," असे पवार म्हणाले.

"पुढील निवडणुकीत पाचोऱ्यात कोण निवडणूक येते, हे मी पाहणार आहे,"असा इशारा त्यांनी यावेळी दिला. "तुम्ही नवीन कामे करा, आमच्या योजनांना स्थगिती देऊ नका,"असे अजित पवार यांनी शिंदे सरकारला सांगितले.

"शिदें-फडणवीस सरकारची बनवाबनवी सुरु आहे. पितृपक्ष असल्याने आत्तापर्यंत आतापर्यंत १२ मंत्र्यांनी चार्ज घेतला नाही, मंत्रीमंडळ विस्तार करण्यापासून मुख्यमंत्री घाबरत आहेत. पालकमंत्री नसल्याने अनेक कामे रखडली आहे,"असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com