'पाहुणे' परतले, अजितदादांशी संबधीत 'आयान'ची तब्बल ७० तास तपासणी

आयान मल्ट्रीट्रेड एल एल पी साखर कारखान्यावर (Ayan sugar Factory)आयकर विभागाने छापा टाकून सलग तीन दिवस तपासणी केली. तब्बल 70 तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी काल रात्री दहा वाजता कारखान्याच्या बाहेर पडले.

'पाहुणे' परतले, अजितदादांशी संबधीत 'आयान'ची तब्बल ७० तास तपासणी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर (Ayan sugar Factory) तीन दिवसापासून आयकर विभागाची कारवाई सुरू होती. कारखान्याच्या आवारात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. कामगारां व्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar mill), पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते.

आयान मल्ट्रीट्रेड एल एल पी साखर कारखान्यावर (Ayan sugar Factory)आयकर विभागाने छापा टाकून सलग तीन दिवस तपासणी केली. तब्बल 70 तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी काल रात्री दहा वाजता कारखान्याच्या बाहेर पडले. सलग तीन दिवस केलेल्या या कारवाईमध्ये आयकर विभागाच्या हाती काय लागले याबाबत साखर कारखाना प्रशासन व आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

गेले तीन दिवस आयकर विभागाचे अधिकारी कारखान्यात ठाण मांडून बसले होते. 2014 -15 साली अवसायनात गेलेला हा साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 150 कोटीहून अधिक किंमतीची मालमत्ता असलेला कारखाना फक्त 47 कोटीमध्ये पुणे येथील ऑस्ट्रेरीया ऍग्रो कंपनीला विक्री कशी केली याबाबत त्यावेळी आरोप झाले होते. हा कारखाना खरेदीसाठी पुणे मध्यवर्ती बँकेने कोट्यवधींचे कर्ज देखील वितरीत केले होते.


'पाहुणे' परतले, अजितदादांशी संबधीत 'आयान'ची तब्बल ७० तास तपासणी
भंगार विक्रेत्या मलिकांवर शंभर कोटीचा दावा ठोकणार : मोहित कंम्बोज संतापले

गेल्या तीन वर्षांपूर्वी या साखर कारखान्याला आयान मल्टीट्रेड एलएलपी असे नाव देण्यात आले आहे. सचिन शृंगारे नामक व्यक्तीच्या नावावर हा कारखाना असून सदर व्यक्ती पार्थ पवारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसापासून सदर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकून मोठ्याप्रमाणावर कागदपत्रांची तपासणी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र गेल्या तीन दिवसांमध्ये आयकर विभागाने नेमकी काय कारवाई केली याबाबत अद्यापही अस्पष्टता असली तरी पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय असलेले सचिन शृंगारे यांच्या आयान मल्टीट्रेड कंपनी मध्ये आलेले पाहूणे अखेर पाहुणचार घेऊन परतले आहे असेच म्हणावे लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या संबधित कंपन्या, नातेवाईक यांची प्राप्तिकर विभागातर्फे छापेमारी सुरु होती. याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ''अजित पवार याबाबत काय म्हणतात, याला महत्व नाही, आता आमच्याकडे तपास यंत्रणा का छापा टाकत नाहीत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे असतील, त्यामुळे छापा टाकला असेल''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in