NCP agitation at Dhule
NCP agitation at DhuleSarkarnama

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून केंद्र सरकारचा धिक्कार!

वाढत्या महाईच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारविरोधात शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

धुळे : बहुत हो गयी महंगाई की मार, बस करो मोदी सरकार अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने धुळे (Dhule) शहरात मोठे आंदोलन केले. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारचा (Centre Governmant) धिक्कार केला. (NCP leaders agitate against centre government on Inflation issue)

NCP agitation at Dhule
सरपंच लीना पाटील यांनी नदीलाही फोडला पाझर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या आदेशाने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. केंद्र सरकारने लादलेली ही कृत्रिम महागाई असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

NCP agitation at Dhule
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

केंद्र सरकारने महागाई नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या आंदोलनातून केली. उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर बोरसे, शेख अमित, शेख एजाज, आनंद पाटील, सागर पाटील, दुर्गेश कोळी, रोशन शेख, वाल्मीक मराठे, स्वप्नील पाटील, निखिल वाघ, परेश पाटील, कल्पेश सुलवाडे, कार्तिक मराठे, राहुल देसले, लोकेश पाटील, निरज हिंगणे, मयूर कासार, किशोर जयस्वाल आदींचा या आंदोलनात सहभाग होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com