NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसने घातले सर्वपित्री अमावास्येला खड्ड्यांचे श्राद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या श्राद्धाला ‘खड्डे काही बुजेना, कावळा हाकी शिवेना’च्या घोषणा
Ranjan Thackray & NCP Workers
Ranjan Thackray & NCP WorkersSarkarnama

नाशिक : शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) रविवारी सर्वपित्री अमावास्येनिमित्त खड्ड्यांचे (Road pits) श्राद्ध घालण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (RanjanThackray) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘खड्डे काही बुजेना, कावळा काही शिवेना’, ‘खड्ड्यात घातलं, खड्ड्यात घातलं, नाशिकला दत्तक बापानं खड्ड्यात घातलं’, अशा घोषणा देत महापालिका (NMC) प्रशासनाचा निषेध करण्यात आला. (NCP workers agitation against NMC on Roads issue)

Ranjan Thackray & NCP Workers
Cooperative: सहकारी संस्थांच्या बांधावरच पाऊस पडणार होता का?

नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नाशिककर खड्डे व धुळीमुळे वैतागले आहेत. शहरातील खड्ड्यांमुळे सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होते. वाहनधारकांना तासन्‌तास रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागतो.

Ranjan Thackray & NCP Workers
Nashik News: नाशिकला डावलणारे जिल्ह्याचे पालकमंत्री कसे?

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत असून, वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शहरातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकीधारकांना विविध आरोग्याच्या समस्या उद्‍भवू लागल्या आहेत.

खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे व कमरेचे आजार जडत आहेत. महापालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर तोडगा न काढल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

आंदोलनात पक्षाचे शहर सरचिटणीस संजय खैरनार, मध्य विधानसभाध्यक्ष किशोर शिरसाठ, शहर उपाध्यक्ष रमेश जाधव, पश्चिम विभागाध्यक्ष कुणाल बोरसे, पश्चिम विभाग युवक अध्यक्ष गणेश पवार, पुरुषोत्तम पटेल, बाळासाहेब अहिरराव, विजय बच्छाव, किरण अहिरे, दिनेश रघुवंशी, विजय ढगे, निरंजन पगार, अक्षय खंदारे, लक्ष्मण शिंदे, अनिल भिडे, मोहन गवारे आदी सहभागी झाले होते.

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकारने टोलमाफी केली. त्याच पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरातील सर्व रस्ते सुसज्ज करीत नाही तोपर्यंत तीन महिन्यांचे नाशिककरांचे विविध कर नाशिक महापालिकेने माफ करावेत.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com