बंडखोर सुहास कांदेच्या मतदारसंघात पंकज भुजबळ झाले सक्रीय!

नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत तालुकाध्यक्ष विनोद शेलार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
Suhas Kande news, Pankaj Bhujbal News, Nashik News, Political News Today
Suhas Kande news, Pankaj Bhujbal News, Nashik News, Political News TodaySarkarnama

नांदगाव : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघात शिवसेनेने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर आता येथे राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघातील पालिकांसह विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भविष्यातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार (Vinod Shelar) यांनी केले. (NCP office bearors meeting at Pankaj Bhujbal Office)

Suhas Kande news, Pankaj Bhujbal News, Nashik News, Political News Today
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधक नको म्हणी शिवसेना नेत्यांच्या मध्यस्थीने मतदारसंघासाठी निधी व मतदारसंघात छगन भुजबळ यांचा हस्तक्षेप नको, अशी तडजोड आमदार कांदे यांनी घडवून आणली होती. आता त्यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी पुन्हा कामाला लागली आहे.(Pankaj Bhujbal News in Marathi)

Suhas Kande news, Pankaj Bhujbal News, Nashik News, Political News Today
सत्ता बदलली म्हणून काय, अध्यक्षपद सोडणार नाही!

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी पालिका निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनाला तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने साद घालून काम करावे, असे आवाहनही तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले.(Suhas Kande news)

बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष काका सोळसे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील, वाल्मीक जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोपान पवार, शहराध्यक्ष गौतम जगताप, सुनंदा खैरनार, राजू लाठे, प्रसाद सोनवणे, दीपक खैरनार, अशोक पाटील, समता परिषदचे शहराध्यक्ष शिवा सोनवणे, महेश पवार, सचिन देवकाते, दत्तू पवार, तानसेन जगताप, दया जुन्नरे, डॉ. सुरेश गायकवाड, सुरेश गायकवाड, अबिद सय्यद, मंगेश पगारे, बाळासाहेब देहाडराय, विश्वास आहिरे, राहुल आहेर आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in