Prakash Ambedkar news; देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

नाशिकमध्ये विराट बौध्द धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांची टीका
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

नाशिक : (Nashik) एका-एका गोष्टीवर निर्बंध (Restriction) टाकत केंद्र (Centre) आणि राज्य शासन (Maharashtra) सर्वसामान्य गोरगरीबांच्या आयुष्याशी खेळत आहे. वेगवेळ्या माध्यमातून सर्वसामान्यांचे ब्रेन वॉशिंग करत एका अर्थांने आपल्या मेंदूचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात सर्वसामान्य माणसांना विचार करायला वेळच मिळत नाही अशा प्रकारची कृती केली जात आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit bahujan Aghadi) संस्थापक आणि भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी सांगितले. (Government is playing with people for there brain washing)

Prakash Ambedkar
Sureshdada jain news; कट्टर विरोधक एकनाथ खडसे भेटीत काय होईल?

या सर्व समदुःखी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम आगामी काळात आपल्याला करावे लागणार आहे. याच माध्यमातून देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे सुरू केली आहे. लोकशाही टिकविण्यासाठी २०२४ मध्ये मोदी विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

Prakash Ambedkar
Rupali Chakankar News; महिलांच्या तक्रार निवारणास प्राधान्य द्या!

भारतीय बौध्द महासभेतर्फे शनिवारी इदगाह मैदानावर झालेल्या बौध्द धम्म मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण बागूल होते. व्यासपीठावर भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर , अशोक सोनवणे, बाळासाहेब शिंदे, वश्र्वनाथ भालेराव, मनोज गाडे, प्रभाकर कांबळे, वामनराव गायकवाड, जितेश शार्दुल, रेखा दिवे, मीनाताई साळवे, सुरेखा लोखंडे आदी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर टिका करतांना विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवित आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आता केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या आचार विचारावर नियंत्रण ठेवणारा मॉरल पोलिसिंगचा कायदा आण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारी सुरु झाली असून २०२४ च्या निवडणुका जिंकल्यानंतर या कायद्याला मूर्त स्वरुप दिले जाण्याची भिती आहे. राजकीय समिकरण बदलण्यास सुरूवात झाली आहे. २०२५ पर्यत देशातील काही करोड लोक बौध्द होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुशील वाघमारे, चेतन गांगुर्डे, शमिभा पाटील, किसन चव्हाण, अशोक सोनजे, एस. के. भंडारे, के. वाय. सुरवाडे, चेतन गांगुर्डे, दिशा पिंकी शेख, प्रवीण बागूल आदींनी मनोगत चारुदास भालेराव, पवन पवार, राजू जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in