दीपक पांडेंच्या विरोधातील महसूल अधिकाऱ्यांचे आंदोलन 'या' कारणामुळे स्थगित

महसूल अधिकाऱ्यांच्या हाती असलेल्या अधिकाराचा फायदा भूमाफिया घेत असल्याचे पांडे यांनी म्हटलं आहे.
Deepak Pandey
Deepak Pandeysarkarnama

नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल अधिकाऱ्यांबाबत लिहिलेल्या लेटर बॅाम्बमुळे खळबळ उडाली आहे. आज महसूल अधिकारी पांडेच्या विरोधात आंदोलन करणार होते. पण त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं आहे.

पांडे यांच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आजचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. नाशिकचे पोलीस (Nashik Police) आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का आहेत, याचे स्पष्टीकरण दिले होते.

नाशिकमध्ये जमीन हडपणे, त्यासाठी हत्या करणे आदी प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांचा सखोल तपास केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग होत असल्याचे सांगितले. भूमाफियांकडून महसूल अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यांचा फायदा घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

Deepak Pandey
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचयं!

दीपक पांडे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतरच्या अनुभवाच्या आधारे हे मत व्यक्त केले. शहरीकरण, औद्योगिककरणामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या हाती असलेल्या अधिकाराचा फायदा भूमाफिया घेत असल्याचे पांडे यांनी म्हटलं आहे.

दीपक पांडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे..

  • शहरीकरण, औद्योगिकरण, आधुनिकीकरण जिथे झाले तिथे अधिकार पोलीस आयुक्तालयाच्या हातात द्या

  • मालेगांव सारख्या शहराला आयुक्तालयाच्या दर्जा द्या.

  • महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावा.

  • भूमाफिया महसूल अधिकारी ना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत.

  • भूमाफिया कडून नागरिकांची सुटका व्हावी कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महसूल अधिकारीकडे असणारे कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com