Amruta Pawar News; छगन भुजबळ यांच्या त्रासामुळेच राष्ट्रवादी सोडला!

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळ यांना आंदन दिल्यासारखी स्थिती आहे.
Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Chhagan Bhujbal & Amruta PawarSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आंदण दिलाआहे. अनेकांना त्याचा त्रास आहे, मात्र ते बोलत नाहीत. त्यांनी आम्हाला खुप त्रास दिला. आमचे राजकारण संपण्याची वेळ आणली म्हणूनच भाजप (BJP) प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे, एकेकाळचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय व माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी सांगितले. (Amruta Pawar criticise NCP Chhagan Bhujbal for politicaly harassment)

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Neelam Gorhe News: मुख्यमंत्र्यांचे न ऐकणाऱ्या मंत्र्याला घरी जावे लागते!

एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, खर तर डॉ. वसंतराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी खुप काम केले. हा पक्ष जेव्हा स्थापन झाला, तेव्हा त्या पक्षाचे कार्यालय आमच्या सुश्रृत हॉस्पीटलमध्ये सुरु झाले. सबंध जिल्हाभर पक्ष वाढविण्याचे काम डॉ. पवार यांनी केले.

डॉ. पवार असतानाच आम्हाला त्रास सुरु झाला. ते असतानाच हॉस्पीटलवर पेट्रोलचे बोळे फेकण्यात आले. आम्हाला त्राल देण्याची जी मालिकासुरु झाली ती अद्यापपर्यंत सुरु आहे. डॉ. पवार यांच्या नंतर निलीमा पवार आणि अगदी माझ्यापर्यंत त्रास देण्याचे प्रकार झाले. मला पण त्रास देऊन आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रकारांच्या मागे एक जातीयवादी अँगल असावा.

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

त्या म्हणाल्या, याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे हे सर्व मांडले. वरिष्ठांनी त्यात लक्ष घालावेआम्हाला त्याचा खुप त्रास होतो आहे. वरिष्ठांनी फक्त ऐकले व ऐकण्याचीच भूमिका घेतली. या सर्व प्रकारांना कंटाळून शेवटी आम्ही आता थांबावे अशी मानसिकता झाली होती. या स्थितीमुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची निवडणूक झाली. त्यात देखील त्यांनी खुप मोठा रोल प्ले केला. खरे तर ही मराठा समाजाची संस्था आहे. मतदार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांनी त्यात भाग घेण्याचे काहीच कारण नव्हते. अशा स्थितीत आम्ही खुप निराश झालो होतो. थांबून घेऊ. राजकारणातून रिटायर होऊ. राजकारण नाही करायचे या निर्णयावर आलो होतो. मात्र सर्व हितचिंतक, कार्यकर्त्यांनी खुप आग्रह धरला. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांचे विकासाचे व्हीजन आहे. लोकांसाठी का नाही हे काम करायचे?. विकासकामे लोकांपर्यंत का नेऊ नये, ते लोकांपर्यंत न्यावे म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. ब्लिडींग हार्टली असेच त्याचे वर्णन करता येईल. दुसरा पर्यायच नव्हता अन्यथा राजकारण सोडावे लागले असते.

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Old Pension News: रॅलीमुळे शहर दोन तास ठप्प... कर्मचारी म्हणाले सॉरी!

माझे सुप्रिया सुळे यांच्याशी माझा खुप ऋणानुबंध होता. त्यांच्या संपर्कात मी होतो. त्यांना आम्ही अडचणी सांगायचो. ते ऐकुण देखील घेत होते. अशा स्थितीत पक्ष सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड व कठीण होता. पक्ष सोडताना आम्हाला खुप त्रास झाला.

आपण शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे अथवा अन्य नेत्यांशी संपर्क का केला नाही?, त्यात काय अडथळा येत होता. या प्रश्नावर त्या म्हणाल्या, यामध्ये अडथळा येत होता, कारण कुठे तरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ यांना आंदन दिल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांकडून हा अडथळा येत होता.

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Cantonment Election: देवळालीच्या निवडणुकीत भाजप विरोधात कसबा पॅटर्न!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आपण भाजपचा प्रचार केला असा आरोप होतो. याबाबत त्या म्हणाल्या, डॉ. भारती पवार या पक्षाशी अतिशय एकनिष्ठ होत्या. दिंडोरी मतदारसंघातून त्यांना पक्षासाठी उमेदवारी केली. पराभूत झाल्या. मात्र दुसऱ्या निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. आम्ही सांगत होतो, त्यांना उमेदवारी द्या असा आमचा आग्रह होता. मात्र भुजबळ यांच्यामार्फत नाव आले नाही म्हणून त्यांना डावलले. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी नाराज झाली व त्यांनी एकनीष्ठ भारती पवार यांना मदत केली. यामध्ये भाजपचे नव्हे तर भारती पवार यांचे काम आम्ही केले.

मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. भाजपमध्ये प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होतील. निवडणूक लढणार का? असा प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या, आम्ही भाजपमध्ये जाताना कोणत्याही अटी, शर्ती, अपेक्षा ठेऊन केलेला नाही. असे अजिबात झालेले नाही. प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करायचे आहे, म्हणून पक्ष प्रवेश केला. जो पक्ष करतो आहे, त्यासाठी हा निर्णय झाला. भविष्यात पक्षाने संधी दिली तर नक्कीच लोकांमध्ये जाऊन कौल घेऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com