फडणवीसांना चिमटा... नाशिकची द्राक्षे आंबट नाही, शरद सीडलेस खुपच गोड!

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
Devendra Fadanvis & Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis & Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : नाशिकचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक म्हणून साहित्य नगरीला कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे नाव दिले. त्यात कोणाच्या अस्मितेचा काय अवमान झाला?. त्यांना द्राक्षे आंबटच वाटतात. मात्र नाशिकची द्राक्षे आंबट नाहीत. शरद सीडलेस तर खुपच गोड आणि रसाळ आहेत, या शब्दांत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) चिमटा काढला.

Devendra Fadanvis & Chhagan Bhujbal
गिरीश महाजनांनी महाविकास आघाडी बाबत शाब्दीक खेळ बंद करावेत!

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, न्या. नरेंद्र चपळगावकर आदींच्या उपस्थितीत झाला. यावेळी आभाराचे भाषण करताना श्री. भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या साहित्य संमेलन स्थळाच्या नामकरणावरून झालेल्या टिकेचा चांगलाच समाचार घेतला.

Devendra Fadanvis & Chhagan Bhujbal
महाराजा सयाजीराव गायकवाड हे शिष्यवृत्ती संकल्पनेचे जनक

श्री. भुजबळ म्हणाले, हे संमेलन गतवर्षी फेब्रुवारीतच ठरले. तेव्हा संमेलन स्थळाला कुसूमाग्रजांचे नाव देण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध करण्याचे कारण अनाकलनीय आहे. कुसूमाग्रज आणि सावरकर दोन्ही आमच्या नाशिकचे आणि आमचेच आहेत. कोणालाही विरोध नाही. कवीकट्टा व्यासपीठाला स्वा. सावरकरांचे नाव देण्यात आले आहे. मी स्वतः अनेकदा संमेलनात सावरकरांचा उल्लेख केला. त्यांची गाणी, साहित्य येथे उल्लेखीत आहेत.

श्री. भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांचा अनुल्लेख करीत, त्यांनी केलेल्या टिकेचा संदर्भ देत सांगितले की, हे सर्व असताना आमच्या अस्मितेचा अवमान झाला असे ते म्हणतात. कोणत्या अस्मितेचा अवमान झाला?. मात्र काय चुकीचे घडले, हे समजत नाहीत. आम्ही कुठेही चुकलेलो नाही. सर्व चांगले झाले. मात्र ते म्हणतात ना, कोणाला तरी द्राक्ष आंबट वाटतात. मात्र नाशिकची द्राक्षे आंबट नाही हो. यामध्ये शरद सीडलेस देखील आहेत. ती अतिशय गोड आहे. आम्ही परत परत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना समजूनच घ्यायचे नसावे. याचे दुःख वाटते. या शब्दांत भाजपचे नेते तसेच श्री. फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी चिमटा घेतला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com